शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वनवे थांबविण्यासाठी वनविभागाची नाविण्यपूर्ण उपाययाेजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST

जंगलांना आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह फुलाचा हंगाम सुरू झाला की मोहफुलं वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा करतात. त्या कचऱ्याला त्याच ठिकाणी जाळून तो न वीजवता घरी निघून जातात. ही आग पसरत जाऊन संपूर्ण जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी येते. यात वनांचे आणि वन्यजीवांचे फार मोठी हानी होते. दरवर्षी लागणाऱ्या हानीमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी हाेते. हे टाळण्यासाठी या वर्षात वन विभागाने स्वतः मोह फुलाच्या झाडा खालील पालापाचोळा ब्लोअर मशीनद्वारे गाेळा केला जात आहे.

ठळक मुद्देब्लाेअर मशीनने कचऱ्याची विल्हेवाट, आग लावणाऱ्यांवर हाेणार कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : मार्च महिना सुरू  झाल्यानंतर जंगलांनाआगी लागण्याचे प्रकार आणि जिल्ह्यात मोहफुल वेचणीचा हंगाम लक्षात घेता जंगलांनाआगी लागण्याचे प्रमाण वाढू नये म्हणून वनविभागाने झाडाखालील पालापाचोळा ब्लोअर मशीनद्वारे नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली आहे वैरागड उपवन क्षेत्रात ही मोहीम वन विभागाचे अधिकारी कर्मचारी राबवितत आहेत. जंगलांना आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह फुलाचा हंगाम सुरू झाला की मोहफुलं वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा करतात. त्या कचऱ्याला त्याच ठिकाणी जाळून तो न वीजवता घरी निघून जातात. ही आग पसरत जाऊन संपूर्ण जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी येते. यात वनांचे आणि वन्यजीवांचे फार मोठी हानी होते. दरवर्षी लागणाऱ्या हानीमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी हाेते. हे टाळण्यासाठी या वर्षात वन विभागाने स्वतः मोह फुलाच्या झाडा खालील पालापाचोळा ब्लोअर मशीनद्वारे गाेळा केला जात आहे. नंतर ताे कचरा जाळून टाकण्याचा मोहीम उघडली आहे. स्वतः वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वन मजूर जंगलात असणाऱ्या मोहफुलाच्या झाडा खालील पालापाचोळा स्वतः नष्ट करीत आहेत. त्यामुळे लोकांना मोह फुलाखालील जागा स्वच्छ करण्यासाठी पालापाचोळ्याचे जाळण्याची गरज पडणार नाही. तरीही पालापाचाेळा स्वताहून जाळून ती आग जंगलात पसरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे पत्र वन विभागाने काढले आहे. वैरागड उपवन क्षेत्रात क्षेत्र सहायक साईनाथ सोनुले, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो, नारायण शिवरकर, प्रवीण धात्रक  वणव्यांना  प्रतिबंध घालण्यासाठी काळजी घेत आहेत. त्यामुळे वनव्यांचे प्रमाण यावर्षी कमी हाेईल, अशी अपेक्षा वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जंगलात गस्ती वाढल्या जंगलांना लागणाऱ्या आगीवर प्रतिबंध घालण्यासाठी वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी पहाटेपासूनच जंगलात गस्त घालत आहेत. गावागावात वनव्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांना याबाबत सूचना देऊन जंगलांना आगी लागण्याचे कोणी जर अघोरी कृत्य करत असेल तर त्याला तात्काळ वन विभागाला कळवावे यासाठी मोबाइल नंबर सुद्धा वन विभागाने प्रसिद्ध केले आहेत.  काही तेंदू ठेकेदार आपल्या मजुरांकरवी जंगलांना मुद्दाम आगी लावतात. अशा कंत्राटदारावरही कारवाई केली जााणार आहे.

 

टॅग्स :forestजंगलfireआग