बनावट सही-शिक्क्यांसाठी बलराजने पुरवली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 05:00 AM2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:52+5:30

बनावट चेक तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ओरिजिनल चेक, त्यावरील शिक्के आणि जिल्हा परिषदेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही कशी आहे ही माहिती मुख्य आरोपींना पुरवण्याचे काम जिल्हा परिषदेतील आरोपी बलराजने केले. तशी कबुली त्याने दिल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ९ झाली आहे. आरोपी बलराजला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांचा पीसीआर मिळाला.

Information provided by Balraj for forged signature-stamps | बनावट सही-शिक्क्यांसाठी बलराजने पुरवली माहिती

बनावट सही-शिक्क्यांसाठी बलराजने पुरवली माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देकोट्यवधीनी फसवणूक प्रकरण : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला अटक, आरोपींची संख्या झाली नऊ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या युनियन बँकेतील खात्यातून बनावट चेकने २ कोटी ८६ लाख रुपये दुसºया खात्यांमध्ये वळते करून फसवणूक करणाऱ्या आरोपींना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यानेच मदत केल्याचे समोर आले. वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत बलराज जुमनाके याला पोलिसांनी अटक केली असून त्याने कशा पद्धतीने मुख्य आरोपींना मदत केली याचा पाढा पोलिसांपुढे वाचला.
बनावट चेक तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ओरिजिनल चेक, त्यावरील शिक्के आणि जिल्हा परिषदेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही कशी आहे ही माहिती मुख्य आरोपींना पुरवण्याचे काम जिल्हा परिषदेतील आरोपी बलराजने केले. तशी कबुली त्याने दिल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ९ झाली आहे. आरोपी बलराजला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांचा पीसीआर मिळाला. त्यामुळे या प्रकरणात अजून कोणती माहिती पुढे येते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
या प्रकरणातील आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन आठवड्यांपूर्वी नागपूर, भंडारा आणि मध्यप्रदेशातून आरोपींना एकाच वेळी अटक झाली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींनी गडचिरोली आणि भंडारा जिल्हा परिषदेतून उडवलेल्या रकमेतून खरेदी केलेले दोन किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने जप्त केले. हे दागिने आरोपीच्या घरात आणि बँकेच्या लॉकरमध्ये होते. याशिवाय खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तांची कागदपत्रेही जप्त केली आहेत.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक पो.निरीक्षक विक्रांत सगणे, उपनिरीक्षक कदम, सहायक उपनिरीक्षक दादाजी करकाडे, हवालदार नरेश सहारे व इतर कर्मचारी करीत आहेत.

अन् बलराजला घेतले ताब्यात
आरोपींनी रक्कम त्यांच्या बँक खात्यात स्थानांतरित करण्यासाठी वापरलेला बनावट चेक, संबंधित अधिकाºयाची सही, शिक्के हे सर्वच बनावट होते. पण ते खऱ्या चेक, सहीशी हुबेहूब मिळतेजुळते होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कोणत्यातरी कर्मचाऱ्याच्या सहभागाशिवाय आरोपींना ही माहिती मिळू शकत नाही याची खात्री पोलिसांना होती. त्यामुळे ते लेखा विभागातील संबंधित कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून होते. पोलिसांना आपला संशय खरा असल्याची खात्री पटताच त्यांनी वरिष्ठ सहायक बलराज जुमनाकेला ताब्यात घेतले. आता पोलिसांकडून काही लपवण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Information provided by Balraj for forged signature-stamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.