मेळाव्याचा अध्यक्षस्थानी तहसीलदार सोमनाथ माळी होते; तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी सुरभी बाविस्कर, कृषी अधिकारी एम. व्ही. जुमनाके होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर, एसआरपीएफ दलाचे पोलीस निरीक्षक बी. जी. अंभोरे, ठाणेदार सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, आदी मान्यवर उपस्थित हाेते. मेळाव्याला चिखली, गोठणगाव, घाटी, अरततोंडी, कढोली येथील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व बचत गटाच्या महिला शेतकरी उपस्थित होत्या. याप्रसंगी तहसीलदार सोमनाथ माळी यांनी महसूल दाखला, ७/१२ बाबत सविस्तर मार्गदर्शन केले; तर कृषी अधिकारी बाविस्कर व जुमनाके यांनी गोपीनाथ मुंडे कृषी अपघात योजना, मानव विकास कृषी साहाय्य योजनांसह विविध कृषी योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांना फणस, काजू, सीताफळ, लिंबू, आदी फळझाडे, चवळी, कारले, भेंडी, गवार, आदी बियाण्यांचे वितरण करण्यात आले. शिक्षक मनोज सोनकुकरा यांनी मेळाव्याचे संचालन, तर पोलीस हवालदार उमेश नेवारे यांनी आभार मानले.
220721\1721-img-20210722-wa0097.jpg~220721\img-20210722-wa0098.jpg~220721\img20210715133920.jpg
मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी सूरभी बाविस्कर~मेळाव्याचा उदघाटन प्रसंगी उपस्थीत मान्यवर~कृषी मेळाव्यात फळझाडे व बि बियाणे वितरण करताना पोलीस अधिकारी