घोट येथे सुप्रस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्यावतीने स्वधारा सीलबंद पाणी बाॅटल व ॲलोविरा ज्युस कंपनीचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून घोटचे सरपंच विनय बारसागडे, उपसरपंच साईनाथ नेवारे, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक सुशील कुमार, पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरिक्षक संदीप रोंढे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार उपस्थित होते. यावेळी आ. डॉ. देवराव होळी व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार यांच्याहस्ते येथील सर्व कामगारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुप्रस ग्रुप ऑफ इंडास्ट्रीजचे उद्योजक सुमीत पोरेड्डीवार म्हणाले, उद्याेगामुळे १५ ते २० महिला व पुरुष बेरोजगारांना राेजगार देण्यास मदत झाली. संचालन मुख्याध्यापक सुनील गाेवर्धन तर आभार किशाेर ढाेरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिग्नेश हलवादिया, प्रवीण बल्लेवार, सतीश टिकले यांनी सहकार्य केले.
उद्याेगामुळे राेजगार निर्मितीस चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST