शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

जमशेदपूरच्या धर्तीवर गडचिरोलीचा औद्योगिक विकास - अजित पवार 

By संजय तिपाले | Updated: December 17, 2023 16:52 IST

झारखंडमधील जमशेदपूरचा स्टील प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला.

गडचिरोली : झारखंडमधील जमशेदपूरचा स्टील प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्या शहराला नवी आळख मिळाली. त्याप्रमाणेच नक्षलग्रस्त गडचिरोलीचाही विकास होईल. नवनवीन प्रकल्प येत आहेत. येथील खनिज संपत्तीतून स्टील निर्मितीसारखे प्रकल्प उभारत आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

कोनसरी (ता.चामोर्शी) येथील लॉयड मेटल्सच्या नियोजित स्टील निर्मिती प्रकल्पास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ डिसेंबरला भेट दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम समवेत होते. कंपनीचे संचालक बी. प्रभाकरन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी प्रकल्पस्थळी लोहखनिजापासून स्टील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. प्रकल्पाच्या उभारणीचे टप्पे, एकूण खर्च, रोजगार निर्मिती आदी बाबी त्यांनी जाणून घेतल्या. यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात उच्च दर्जाचे खनिज आहे. त्यातून स्टील निर्मितीसारखे प्रकल्प उभे राहत आहेत, ही औद्योगिक क्रांती आहे. नक्षलग्रस्त भागात स्थानिकांना रोजगाराची साधने फारशी नाहीत, त्यामुळे अशा उद्योगांतून नवीन संधी निर्माण होतील. गडचिरोलीतील नियुक्तीकडे अधिकारी शिक्षेच्या स्वरुपात पाहत. मात्र, अशा प्रकल्पांमुळे ती ओळख पुसली जाणार आहे. नामांकित कंपन्यांनी जमशेदपूरमध्ये उद्योग उभारल्याने त्या शहराचा विकास झाला, त्याप्रमाणेच गडचिरोलीचाही विकास होईल. उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न असून समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून गडचिरोली व चंद्रपूरला जोडण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय रेल्वेमार्गातूनही दळणवळणाचे साधन निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उप पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.

अतिदुर्गम नारगुंडा गावाला भेटअधिवेशनानिमित्त नागपूर मुक्कामी असलेेले उपमुख्यमंत्री अजित पवार हेलिकॉप्टरने नारगुंडा (ता.भामरागड) या अतिदुर्गम गावात पोहोचले. मंत्री धर्मरावबाबा आत्राम त्यांच्या समवेत होते. यावेळी तेथे पोलिसांच्या वतीने आयोजित जनजागरण मेळाव्यास त्यांनी उपस्थिती लावली. आदिवासींशी संवाद साधून पवार यांनी पोलिस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना विविध जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले. त्यानंतर हेलिकॉप्टरनेच ते कोनसरी प्रकल्पस्थळी पोहोचले. गडचिरोली शहरात अधिकाऱ्यांशी संवाद साधून नंतर ते नागपूरला परतले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAjit Pawarअजित पवार