शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रावती, गोदावरीला रौद्ररुप; ३३० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 12:26 IST

सिरोंचात पुराचा कहर: बचावकार्य युध्दपातळीवर सुुरु

कौसर खान/ संजय गज्जलवारसिरोंचा / जिमलगट्टा: तेलंगणातील अतिवृष्टीमुळे विसर्ग वाढल्याने गडचिरोलीत इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी नदीने रौद्ररुप धारण केले आहे. नदीकाठच्या गावांना पुरांनी वेढण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने रात्रभर मदतकार्य राबवून सुमारे ३३० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

तेलंगणातील कडेम धरण ओव्हरफ्लो झाले आहे

येलमपल्ली धरणाचे ६२ पैकी ४८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. येलमपल्लीतून २५ हजार ६९३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मेडीगड्डा धरणाचे सर्व ८५ दरवाजे उघडले आहेत. त्याद्वारे सुमारे ३७ हजार ८८१ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत  आहे. मेडीगड्डाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यातील इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी या नद्यांमध्ये मध्यरात्रीनंतर पाण्याचा ओघ वाढला. सध्या दोन्ही प्रमुख नद्या तुडुंब भरुन वाहत आहेत. नगरम, जानमपल्ली, मुगापूर चक, चिंतमपल्ली, रामकृष्णपूर, मद्दीकुंठा या गावांत प्रशासनाने बचावकार्य राबवून रात्रीतून सुमारे ३३० नागरिकांनी सुरक्षितस्थळी हलविले आहे. या लोकांना सिरोंचातील आश्रमशाळेसह इतर शासकीय इमारतींत ठेवले आहे. तेथे निवासासह जेवण व आरोग्यसुविधा पुरविण्यात येत आहेत. 

आज व उद्या शाळा बंद

दरम्यान, तालुक्यात पुराचा तडाखा बसल्याने २८  व २९ जुलै रोजी शाळा,महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुटी जाहीर केली आहे. तालुक्यात रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे हे सर्व विभागांशी समन्वय ठेऊन पूरग्रस्तांना मदतकार्य करत आहेत.

अहेरी तालुक्यालाही पुराचा तडाखा

जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जोगनगुडा, तिमरम, दुब्बागुडम या गावांत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली.  घरातील धान्य, जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. पिके देखील पाण्याखाली गेली असून पशुधनासह स्वत:चा जीव वाचविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. तलाठी सचिन मडावी यांनी  पूरग्रस्तांना भेट देऊन धीर दिला. नुकसानीचे पंचनामे करुन भरपाईचा प्रस्ताव पाठविला जाईल,असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीfloodपूरriverनदीRainपाऊस