शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांच्या पीडितेची उपचाराअभावी हेळसांड, तीन डॉक्टरांची सेवासमाप्ती

By संजय तिपाले | Updated: March 13, 2024 17:20 IST

'लोकमत'चा दणका,वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडील 'डीएमओं'चा पदभार काढून घेणार.

संजय तिपाले, गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जारावंडीत अत्याचार पीडित पाच वर्षांच्या चिमुकलीची उपचाराअभावी हेळसांड झाल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी १३ मार्चला मोठी कारवाई केली. तीन मानसेवी डॉक्टरांना त्यांनी निलंबित केले तर जारावंडीत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी राहावा, यासाठी तेथे नियुक्त असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी  डॉ. लोकेशकुमार कोटवार यांच्याकडील जिल्हा हिवताप अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यासाठी उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 'लोकमत'ने या प्रकरणाला सर्वात आधी वाचा फोडली होती.

एटापल्ली तालुक्यातील एका गावात पाच वर्षांच्या बालिकेशी आरोग्य केंद्राच्या शिपायाने कुकर्म केल्याचा घृणास्पद प्रकार ९ मार्चला समोर आला होता. पीडितेला घेऊन नातेवाईक जारावंडी आरोग्य केंद्रात गेले असता तेथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना पेंढरी गाठावे लागले. पेंढरीतील आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करुन त्यांनी नंतर गडचिरोली गाठले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने पीडितेला नागपूरला हलवावे लागले. दरम्यान, या प्रकरणानंतर अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवेची विदारक स्थिती चव्हाट्यावर आली. ११ मार्चला मोर्चा काढून संतप्त नागरिकांनी आरोग्य केंद्रास टाळे लावले होते.

१२ मार्चला खुद्द जि.प. सीईओ आयुषी सिंह यांनी तेथे भेट देऊन स्थानिकांना विश्वास देत कुलूप उघडले व आरोग्य सेवा पूर्ववत केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्याकडून अहवाल मागवला. त्यानंतर जारावंडी येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेले डॉ. अर्चना हिरेखण, डॉ.जागृती गावडे व डॉ.राकेश हिरेखण यांची सेवासमाप्ती करण्याचे आदेश आयुषी सिंह यांनी जारी केले. मुख्यालयी गैरहजर राहून पीडितेवर उपचारात हलगर्जी केल्याचा या सर्वांवर ठपका आहे. यासोबतच डॉ. राकेश हिरेखण यांच्यावर नागरिकांना उध्दट वागणूक देत असल्याचाही आरोप आहे. या कारवाईने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.उपसंचालकांना प्रस्ताव - दरम्यान, जारावंडीत नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.लोकेशकुमार कोटवार यांच्याकडे जिल्हा हिवताप अधिकारीपदाचाही अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे त्यांचे मूळ नेमणुकीच्या ठिकाणी दुर्लक्ष झाले. याकरता नियमित जिल्हा हिवताप अधिकारी नियुक्त करावा. जेणेकरुन डॉ. लोकेशकुमार कोटवार यांना मूळ पदभार असलेल्या जारावंडीत पूर्णवेळ सेवा देता येईल, असा प्रस्ताव जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी आरोग्य उपसंचालकांना पाठवला आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीzpजिल्हा परिषदdoctorडॉक्टर