शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गडचिरोलीत जादूटोण्याच्या संशयातून हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 9:02 PM

जादूटोणा केल्याच्या संशयातून एका इसमास ठार करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ४० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्दे४० हजार रुपये दंडही ठोठावलाव्हिडीओ कॉन्फरन्सने निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जादूटोणा केल्याच्या संशयातून एका इसमास ठार करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ४० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.रूपू डुकरू पुंगाटी(४१) व महारू दसरू गाडवे(३३) दोघेही रा. कोठी, तालुका भामरागड अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी त्यांच्याच गावातील दोबा गाडवे यांची ५ एप्रिल २०२० रोजी हत्या केली होती. दोबा व त्यांची पत्नी वारली हे शेतातील झोपडीत राहात होते. घटनेच्या रात्री आरोपी रूपू व महारू या दोघांनी दोबा यांची शेतातील झोपडी गाठून पती-पत्नीला झोपेतून उठविले. त्यानंतर तू माझ्या मुलीला जादू करून मारले, असे म्हणून महारू याने दोबाचे दोन्ही हात पकडून ठेवले तर रूपूने दोबाच्या डोक्यावर कुºहाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दोबाची पत्नी वारली हिने रूपूच्या हातातील कुºहाड हिसकावली. या झटापटीत वारली सुद्धा जखमी झाली. त्यानंतर रूपूने सोबत आणलेला लोखंडी घन दोबाच्या डोक्यावर मारला. यात दोबा जागीच ठार झाला.

याबाबतची फिर्याद वारली गावडे हिने कोठी पोलीस मदत केंद्रात केल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक मिथून सावंत यांनी तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींविरोधात सबळ पुरावे आढळून आल्याने सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी दोन्ही आरोपींना कलम ३०२, ३४ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३०७, ३४ अन्वये १० वर्षांचा कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच फिर्यादीस २० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

विशेष म्हणजे २८ सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे हा निकाल देण्यात आला. सरकारी अभियोक्ता म्हणून एन. एम. भांडेकर यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी पोलीस निरिक्षक प्रकाश तुनकलवार यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी