शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

'टायगर कॉरिडॉर'च्या नावे विकासाची कामे अडवाल तर आता थेट घरी जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:26 IST

सहपालकमंत्र्यांची तंबी : ५६ कोटींचा वाढीव निधी, साहित्य खरेदी चौकशीसाठी 'एसआयटी'

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात व्याघ्र कॉरिडॉरच्या नावाखाली महामार्गाची कामे अडवून ठेवली आहेत, मूळात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचा २०१४ मधील व्याघ्र कॉरिडॉरच्या तरतुदींचा विपर्यास केला आहे. संपूर्ण देशात व्याघ्र कॉरिडॉरचे नियम सारखे हवेत, अशी भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली कोठे रस्त्यांची कामे अडवून लोकांना मरणयातना द्याल तर घरी जाल, अशा शब्दांत सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी वनविभाग व महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १४ ऑगस्ट रोजी झाली. यावेळी २०२५-२६ या वर्षासाठी ५६ कोटी रुपयांचा वाढीव निधीला मंजुरी मिळाली आहे. खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, जि.प. सीईओ सुहास गाडे यांची उपस्थिती होती. अनावश्यक बांधकामांवर खर्च करण्यापेक्षा सामान्यांचे जीवनमान उंचावेल, अशा बाबींवर खर्च करावा, असे निर्देश सहपालकमंत्र्यांनी दिले.

...तर कामे अडविणाऱ्यांवर अन् दिरंगाई करणाऱ्यांवरही कारवाईसिरोंचा- आलापल्ली महामार्गाचे ४३ किलोमीटरचे काम व्याघ्र कॉरिडॉरच्या नावाने रखडलेला आहे. याबाबत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी लक्ष वेधले. यावर सहपालकमंत्री अॅड. जयस्वाल यांनी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक व महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना भरबैठकीत समोरासमोर उभे केले. टायगर कॉरिडॉरच्या नियमांचे पालन झाले पाहिजे, पण त्यातील तरतुदींच्या नावाखाली काम अडवून ठेवू नका, कामे अडवत असेल तर मला सांगा, असे सहपालकमंत्री म्हणाले. 

कोट्यवधी रुपयांचे साहित्य धूळखात कसे काय ?जिल्हा रुग्णालयात २०२२-२३,२०२३-२४ मध्ये कोट्यवधी रुपयांची साहित्य खरेदी केली. शिवाय औषधी खरेदीमध्ये देखील निविदा प्रक्रियेला फाटा दिला, असे चौकशीत समोर आल्याचे सहपालकमंत्र्यांनी सांगितले. यावरुन त्यांनी भरबैठकीत चौकशी अहवालातील तपशील वाचून दाखवित हे साहित्य धूळ खात कसे पडले आहे, ते वापरात नसेल तर त्याची खरेदी का केली, अशी विचारणा केली.यासंदर्भात विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात येणार २ असल्याचे त्यांनी सांगितले. यात तत्कालीन निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सकांवरही कारवाई करण्यात येणार असून यापुढे अशा प्रकारे वाढीव दराने औषधी व आवश्यकता नसताना साहित्य खरेदी केल्यास थेट बडतर्फ केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAshish Jaiswalआशीष जयस्वाल