शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

-तर वाचले असते स्फोटातील अनेक पोलिसांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 12:13 AM

कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देआततायीपणा : भूसुरूंगरोधक वाहनाचा वापरच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस दलाकडे ३४ भूसुरूंग रोधक वाहने असताना ‘क्युआरटी’च्या (शिघ्र प्रतिसाद पथक) १५ जवानांसाठी त्यापैकी एकही वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. हे वाहन असते तर भूसुरूंग स्फोटाची झळ कमी होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हाणी टाळणे शक्य झाले असते, असा कयास लावल्या जात आहे.जिल्हा पोलीस दलाकडे नक्षलविरोधी अभियानासाठी २००७ मध्ये काही भूसुरूंग रोधक वाहने आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अशी एकूण ३४ वाहने गडचिरोलीपोलिसांना मिळाली आहेत. जिल्ह्यात १० उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली १० क्युआरटी पथक आहेत.नक्षलविरोधी मोहिमेत तातडीने कुठेही जाण्यासाठी या पथकाला नेहमी सज्ज असावे लागते. त्यामुळे या पथकांसाठी १० भूसुरूंग रोधक वाहने असणे आवश्यक असताना त्या दिवशी कुरखेडा येथे हे वाहन नव्हते. परिणामी अधिकाºयांच्या आदेशानुसार या पथकाला तातडीने खासगी वाहनातून नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली त्या दादापूरकडे निघावे लागले. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी घात केला.वास्तविक त्यांच्यासाठी भूसुरूंग रोधक वाहन उपलब्ध असते आणि त्यातून हे जवान गेले असते तर स्फोटाची झळ कमी प्रमाणात जाणवून एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हाणी टाळणे शक्य झाले असते.भूसुरूंगरोधक वाहनांची क्षमता काय?नक्षलवाद्यांनी गेल्या १२ वर्षात ३ वेळा भुसूरूंग रोधक वाहने स्फोटात उडविली आहेत. त्यात झालेली वाहनांची हाणी पाहता या वाहनांची खरोखरच किती स्फोटक सहन करण्याची क्षमता आहे याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. मे २०१७ मध्ये भामरागड-कोटी मार्गावर घडवून आणलेल्या स्फोटात भूसुरूंग रोधक वाहनाचे मोठे नुकसान होऊन दोन पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या वाहनांची स्फोटक सहन करण्याची क्षमता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.खबरीमुळे यशस्वी झाला नक्षलवाद्यांचा डावदादापूरमध्ये रस्त्याच्या कामावरील कंत्राटदाराची वाहने जाळल्यानंतर पोलीस तिकडे जातील याचा अंदाज घेऊन जांभुळखेडा ते लेंढारीदरम्यानच्या छोट्या पुलाखाली नक्षलवाद्यांनी आधीच भूसुरूंग पेरून ठेवले होते. पण जानेवारी महिन्यातच डांबरीकरणाने गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर भूसुरुंग पेरला असू शकतो याची पुसटशीही कल्पना पोलिसांना आली नाही. त्यामुळे कुरखेडाचे एसडीपीओ यांनी शैलेश काळे यांनी क्युआरटी पथकाला तिकडे बोलविताच हे १५ जवान मागचापुढचा विचार न करता निघाले. पोलीस पथक तिकडे निघाल्याची माहिती कुरखेडा येथूनच खबरीकडून नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे तो खबरी कोण? याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसGadchiroliगडचिरोली