शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

शिवसेना सत्तेत असली तर आंदोलन करणार

By admin | Updated: October 7, 2015 02:25 IST

शिवसेना सत्तेत असले तरी सर्वसामान्य जनतेच्या न्याय मागण्यांसाठी शासनाच्याच विरोधात आंदोलन करण्यासाठी कधीच मागेपुढे पाहणार नाही,...

किशोर कन्हेरे यांचे प्रतिपादन : कुरखेडात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावाकुरखेडा : शिवसेना सत्तेत असले तरी सर्वसामान्य जनतेच्या न्याय मागण्यांसाठी शासनाच्याच विरोधात आंदोलन करण्यासाठी कधीच मागेपुढे पाहणार नाही, गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिक सदैव झटत व झिजत राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख किशोर कन्हेरे यांनी केले.शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा कुरखेडा येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना किशोर कन्हेरे बोलत होते. यावेळी मंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी जिल्हाप्रमुख हरीश मने, माजी आ. रामकृष्ण मडावी, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, भरत जोशी, डॉ. महेंद्र मोहबंशी, जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, उपजिल्हा संघटक अशोक गावतुरे, नसरू भामानी, नंदू चावला, विजय बुल्ले, चंदू बेहरे, कवडू सहारे, अनंत बेझलवार, दामू उईके, बबन बुद्धे, पुंडलिक देशमुख, मनोहर लांजेवार, नरेंद्र तिरनकर, दिगांबर मानकर, निलकमल मंडल, गट्टू नुकूम, राजगोपाल सुल्लावार, प्रशांत किलनाके, मधुकर चौधरी, सोनलवार, सोनू भट्टड, खुशाल बन्सोड, सरपंच ममीता आडे, अप्पा सोमकुवर, माया आलाम, बोरकर, मीना भोयर, गौरी उईके, दुर्गा सयाम, छगन सेडमाके, अशोक गायकवाड, नूतन सातव, शैलेश चिटमलवार, पुरूषोत्तम तिलगाम, लोमेश कोटांगले आदी मान्यवर उपस्थित होते.जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करण्याबरोबरच सत्तेत असणे फार महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यात १० नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीदरम्यान सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवून मते मागावी, जिल्ह्यातील ओबीसी, बेरोजगार युवक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना धरून रस्त्यावर उतरण्यास शिवसेना कधीच मागेपुढे पाहणार नाही, नगर पंचायत निवडणूक प्रत्येक कार्यकर्त्यांनी ताकदीनीशी लढले पाहिजे, असे आवाहन किशोर कन्हेरे यांनी कार्यकर्त्यांना केले. (तालुका प्रतिनिधी)