शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत सापळ्यात अडकून हरणांसह शिकाऱ्याचीही झाली शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 19:19 IST

जंगलात अवैैधरित्या शिकार करीत असताना शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन हरणांसह शिका-याचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारच्या पहाटे घडली.

गडचिरोली -  आलापल्ली-सिरोंचा मार्गावर मोसम गावाजवळील जंगलात अवैैधरित्या शिकार करीत असताना शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन हरणांसह शिका-याचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारच्या पहाटे घडली.मृत शिकाºयाचे नाव विलास श्यामराव सडमेक (४०) रा.झिमेला असे असून तो मूळचा व्यंकटापूरचा रहिवासी आहे. आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील वनविकास महामंडळ (एफडीसीएम)च्या जंगलात मुख्य मार्गावरून पूर्वेस १ किमी अंतरावर जंगलात जिवंत विद्युत तारा टाकून शिकार करण्याचा प्रयत्न केला जात होता. मुख्य मार्गावरील रस्त्याच्या पलिकडील ११ केव्ही विद्युत वाहिनीवरून सदर तार टाकून पुलाच्या खालून तार काढण्यात आल्या  होत्या.  या तारांना स्पर्श होऊन दोन हरीण मरण पावले. मात्र सोबतच शिकारीही स्वत:च लावलेल्या वीज प्रवाहाच्या झटक्याने मरण पावला.सदर घटना वन विकास महामंडळाच्या जंगलातील कंपार्टमेंट नं. २४ (चंद्रा फेलिंग सिरीज), मोसम बिट, राऊंड २ मध्ये घडली. या शिकारीत मृतकासह आणखी किमान तीन व्यक्तींचा समावेश असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. अन्य आरोपींचाही लवकरात लवकर शोध घेतला जाईल, अशी माहिती एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक सुनील पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. मृतक विलास सडमेक हा १० वर्षांपासून सासुरवाडीला राहून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. विभागीय व्यवस्थापक पाटील यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. याप्रसंगी सहायक व्यवस्थापक एस.एल. रामटेके, एस.एस. कोंडागुर्ले, एस. यू. उईके, यू. बी. बिसेन, एम. बी. मेनेवार, गजभिये आदी उपस्थित होते. याशिवाय वन्यजीवप्रेमी रामू मादेशी, सुरेश आलाम, राजू वैद्य, गणेश सडमेक, किशोर सडमेक उपस्थित होते. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अभियंता तसेच अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर आपल्या कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहोचले. याप्रसंगी अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज चव्हाण, चंद्रकांत सडमेक आदी उपस्थित होते

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीforestजंगलDeathमृत्यूnewsबातम्या