शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजालाही हवा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:43 IST

लोकसंख्येच्या तुलनेत कुणबी समाजापेक्षा कमी असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मिळाले, पण बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला त्या आरक्षणाचा वाटा मिळाला नसल्यामुळे या समाजातील बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षण : १६ टक्क्यांमध्ये समावेशाची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसंख्येच्या तुलनेत कुणबी समाजापेक्षा कमी असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मिळाले, पण बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला त्या आरक्षणाचा वाटा मिळाला नसल्यामुळे या समाजातील बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षणात आम्हालाही वाटा द्या, अशी मागणी ठिकठिकाणी जोर धरत आहे.यासंदर्भात कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनीही एका पत्रकातून या मागणीला उचलून धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देऊन त्या समाजाला न्याय दिला. या आरक्षणासाठी ५२ आंदोलने व ४० जणांना बळी जावे लागले. परंतू मराठ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करीत असताना कुणबी समाजाला सोबत घेऊनच आंदोलने केली. मराठा नेते कुणबी आणि मराठा आम्ही एकच आहोत, आमच्यात रोटी-बेटीचे व्यवहार चालतात म्हणून आम्हाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करून घ्यावा, अशी मागणी करीत होते. परंतू ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी विरोध केल्याने सरकारने त्यांना एसबीसी प्रवर्गात समावेश करून एकूण ५१ टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून तामिळनाडूच्या धर्तीवर १६ टक्के आरक्षण दिले. परंतू जातीनिहाय जनगणना झालेली नसताना मराठ्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात ३२ टक्के ठरविणे चुकीचे आहे, असे ठाम मत भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रात १०० टक्क्यांपैकी ५२ टक्के ओबीसी, एससी-एसटी २ टक्के आणि मुस्लिम, ब्राह्मण व तत्सम खुल्या प्रवर्गातील जाती पकडून १०० टक्के लोकसंख्या होते. त्यात ३२ टक्के मराठा समाज दाखविणे चुकीचे असल्याचा आरोप वाघरे यांनी केला.मराठा समाजाकडून संपूर्ण राज्यात आंदोलने केली जात असताना मराठवाड्यात सकल मराठा मोर्चा, तर कोकण, खान्देश आणि विदर्भात मराठा-कुणबी मोर्चा अशा पद्धतीचे होर्डिंग लावून या आंदोलनात कुणबी समाजाला समाविष्ठ करून घेण्यात आले होते. मग आता आरक्षणात कुणबी समाजाला वाटा का नाही? असा सवाल कुणबी समाजातील युवकांकडून केला जात आहे.राज्य सरकार सध्या नोकरभरतीचा गवगवा करीत असल्यामुळे अनेक बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतू त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळेल पण आपल्याला नाही, या कल्पनेने कुणबी समाजातील बेरोजगार युवक अस्वस्थ होत आहेत.ही तर फसवणूकआरक्षणासाठी मराठा समाज खरोखरच पात्र आहे का? आणि या समाजाची लोकसंख्या किती हे तपासण्यासाठी तत्कालीन सरकारने राणे समिती गठीत केली होती. परंतू त्या समितीने गडचिरोली जिल्ह्यात मराठा समाजाची १८ हजार कुटुंब असल्याची माहिती प्रशासनामार्फत शासनाला दिली. वास्तविक विदर्भातील जिल्ह्यांत राहणाऱ्या कुणबी समाजाची गणना मराठा समाजात करून राणे समितीने कुणबी समाजाची फसवणूक केली. महाराष्ट्रात होणाऱ्या मेगाभरतीत कुणबी समाजाला मराठा आरक्षणात वाटा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी केली.

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षण