शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
3
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
4
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
5
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
6
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
7
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
8
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
9
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
10
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
11
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
12
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
13
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
14
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
15
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
16
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
17
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
18
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
19
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
20
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

गारपिटीने उन्हाळी धानाचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 5:00 AM

देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी येते. तसेच गाढवी नदी, विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून ४ हजार २६ हेक्टरवर यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. शिवराजपूर, उसेगाव, फरीझरी परिसरातही २२० हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीयोग्य झाले आहे. अशातच रविवारी रात्रीच्या सुमारास जवळपास अर्धा तास विजांच्या कडकडाटासह गारपीठ पाऊस झाला. सोबतच वादळी सुटले.

ठळक मुद्देवादळासह पाऊस : झरी, फरी, शिवराजपूरसह अनेक गावांना बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : रविवारी रात्री झालेल्या वादळ व गारपिटीमुळे देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर, उसेगाव, फरी या गावांमधील धान पिकाचे लोंब गळून पडले. त्यामुळे धानाचा सडा बांधीत पडला आहे. धानपीक निघण्याच्या स्थितीत असताना गारपिटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी येते. तसेच गाढवी नदी, विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून ४ हजार २६ हेक्टरवर यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. शिवराजपूर, उसेगाव, फरीझरी परिसरातही २२० हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीयोग्य झाले आहे. अशातच रविवारी रात्रीच्या सुमारास जवळपास अर्धा तास विजांच्या कडकडाटासह गारपीठ पाऊस झाला. सोबतच वादळी सुटले.गारपीट व वादळामुळे धानाचे लोंब गळून पडले. परिपक्व झालेल्या धानाचा सडा बांध्यांमध्ये पसरला होता. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा खर्चही भरून निघणे कठीण आहे. हातात आलेले पीक नष्ट झाले असल्याचे बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. तेलंगणा राज्यातून आलेले मजूर शाळांमध्ये थांबले आहेत. पावसामुळे त्यांचे हाल झाले.लोंबाला १० टक्केच धान शिल्लकदेसाईगंजचे तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम यांनी प्रत्यक्ष धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी धानाच्या लोंबाला केवळ १० टक्केच धान शिल्लक असल्याचे सांगितले. उन्हाळी धानाला सरासरी २५० पेक्षा अधिक धान राहतात. गारपीठीमुळे आता लोंबाला केवळ १० ते २० एवढेच धान शिल्लक आहेत. केवळ १० टक्के धान शिल्लक असल्याने एवढ्या धानासाठी धानाची कापणी, बांधणी व मळणी करणे अशक्य आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या धानाच्या पिकात जनावरे शिरवल्याशिवाय पर्याय नाही.गारपीठीने नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी जि.प.च्या महिला व बाल कल्याण सभापती रोशनी पारधी, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, तहसीलदार डी. टी. सोनवाने, मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम आदी उपस्थित होते.रविवारी पहाटे अवकाळी पाऊसगडचिरोली : रविवारी रात्री व पहाटेच्या सुमारास जिल्हाभरात अवकाळी पाऊस झाला. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा यामुळे अनेकांच्या घरांवरील छत उडून गेले. आष्टी परिसरात सकाळी ८ वाजतापासून वादळवाºयासह पाऊस झाला. आलापल्ली परिसरातही सकाळीच पाऊस झाल्याने आलापल्ली येथील बाजारातील गर्दी कमी झाली. एटपपल्ली तालुक्यातही पाऊस झाला. गावाबाहेरच्या झोपड्यांमध्ये क्वॉरंटाईन असलेल्या मजुरांचे मोठे हाल झाले. धानोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज तारांवर झाडे पडल्याने रात्री ३ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नेमक्या कोणत्या कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाला हे एमएसईबीचे अधिकारी सांगत नाही. त्यामुळे नागरिकांना केवळ वीज पुरवठा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागते. मुलचेरा तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. आष्टी परिसरातील मार्र्कंडा कं. ते मुलचेरा मार्गावर झाडे पडली. जेसीबीच्या सहाय्याने सदर झाडे बाजुला करून मार्ग मोकळा करण्यात आला. मानापूर देलनवाडी परिसरातही वादळी पाऊस झाल्याने रात्री वीज पुरवठा खंडीत झाला होता.भाकरोंडी परिसरात ७ मे रोजी वादळी वाºयासह पाऊस झाला. वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलु उडून गेले. भांसी येथील नागरिक शामराव सिताराम अलाम, ऋषी आत्राम, आशा अलाम व भाकरोंडी येथील वनिता प्रमोद जाळे यांच्या घरावरील कवेलु उडून गेल्याने नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊस