शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:37 IST

काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत लक्षणे दिसूनही नागरिक चाचणी करून घेत नव्हते. उलट गावातच उपचार करून घेण्याकडे त्यांचा कल राहत हाेता. ...

काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत लक्षणे दिसूनही नागरिक चाचणी करून घेत नव्हते. उलट गावातच उपचार करून घेण्याकडे त्यांचा कल राहत हाेता. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे नागरिकांमध्ये काेराेनाची भीती निर्माण हाेऊन चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.

१ एप्रिल ते १० मे या कालावधीत सुमारे ५७ हजार ९१७ नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. चाचण्या वाढल्याने रुग्णाचे वेळीच विलगीकरण करणे शक्य झाल्याने काेराेनाची लाट काही प्रमाणात थोपविणे शक्य झाले आहे.

काेराेना चाचण्यांचे प्रमाण वाढले ही जमेची बाब आहे. त्याचबराेबर लसीकरणाची गती वाढविण्यासाठीही आराेग्य विभागाला मेहनत घ्यावी लागणार आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये अजूनही लसीविषयी गैरसमज असल्याने ते लस घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवर लस पडून आहेत. हा गैरसमज दूर झाल्याशिवाय नागरिक लस घेणार नाहीत. नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आराेग्य विभागाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

बाॅक्स

सव्वा महिन्यात ३२ टक्के टेस्टिंग

काेराेनाच्या सुरुवातीपासून ते १० मेपर्यंत जिल्हाभरातील १ लाख ८२ हजार १५७ नागरिकांच्या रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १ एप्रिल ते १० मे या कालावधीत सुमारे ५७ हजार ९१४ नागरिकांच्या टेस्ट झाल्या आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ३१.७९ टक्के एवढे आहे.

बाॅक्स

१८ वर्षांवरील नागरिकांसाठी ग्रामीण भागात लसीकरण केंद्र वाढवा

१८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उत्साह दिसून येत आहे. मात्र, या नागरिकांसाठी केवळ शहर व तालुकास्तरावरच लसीकरण केंद्रे ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण भागातही लसीकरण केंद्रे वाढविण्याची गरज आहे.

बाॅक्स

ग्रामीण भागात काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा

१. एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर यापूर्वी आराेग्य विभाग काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवीत हाेता. आता मात्र काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम पूर्णपणे ठप्प आहे.

२. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीविषयी जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची गरज आहे.

बाॅक्स

१ एप्रिल ते १० मे या कालावधीत झालेल्या अँटिजन चाचण्या

तालुका चाचण्या रुग्ण

अहेरी ५८३२ १०३२ आरमाेरी ४९६२ ९४७ भामरागड १७२८ ३७७ चामाेर्शी ७८१७ ९२१ धानाेरा ३०५४ ५२० एटापल्ली ३४९६ ६४८ गडचिराेली १०५८७ २९०४ काेराची २६५६ ५३० कुरखेडा ३८७६ ७४६ मुलचेरा ३३९९ ४२२ सिराेंचा ३६५८ ५९६

देसाईगंज ६६०६ १०७३ एकूण ५७,९१४ १०,७१६

एकूण रुग्ण-

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ३६३९ गृहविलगीकरणातील रुग्ण - २२०२ गडचिराेली शहरातील रुग्ण - १२३६ बरे हाेण्याचे प्रमाण - ८३.८१

बाॅक्स (लसीकरण)

आराेग्य कर्मचारी - ८५८२ फ्रंटलाइन वर्कर - १८,६४८

ज्येष्ठ नागरिक - २५,०५१ ४५ ते ५९ - ३०,४५९ १८ ते ४४ - ८११२