काेविड याेद्धा म्हणून प्रदीप चापले यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:00+5:302021-02-05T08:48:00+5:30

कोरची : स्थानिक वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. प्रदीप चापले यांचा गोंडवाना विद्यापीठातर्फे कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात ...

Honoring Pradip Chaple as Kavid Yaddha | काेविड याेद्धा म्हणून प्रदीप चापले यांचा सन्मान

काेविड याेद्धा म्हणून प्रदीप चापले यांचा सन्मान

कोरची : स्थानिक वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. प्रदीप चापले यांचा गोंडवाना विद्यापीठातर्फे कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते चापले यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात आले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी उपस्थित होते. कोविड माहामारीत संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र शासनाकडून गोंडवाना विद्यापीठद्वारा गडचिरोली जिल्हा नोडल अधिकारी म्हणून प्रा. प्रदीप चापले यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती, ऑनलाईन प्रश्नमंजूषा, यूट्यूब व्हिडिओ, वेबिनार, मोफत मास्क वितरण, गरजूंना अन्नधान्याचे वितरण, सुरक्षित आजी-आजोबा अभियान, फिट इंडिया अभियान, माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान, रक्तदान शिबिरे असे विविध उपक्रम जिल्हाभर राबविले हाेते.

Web Title: Honoring Pradip Chaple as Kavid Yaddha