शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

१३२ प्रज्ञावंतांचा पदवीने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:00 AM

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर, राज्यपालांचे प्रतिनिधी डॉ.सी.डी.माई, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्दे‘गोंडवाना’चा दीक्षांत समारंभ : एसटीआरसीच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित करण्याचे काकोडकर यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी गुरूवारला विद्यापीठाच्या परिसरात प्रशस्त शामियानात पार पडला. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केलेले २१ तसेच सुवर्णपदक प्राप्त ३१ व गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेल्या जवळपास ८० अशा एकूण १३२ प्रज्ञावंतांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर, राज्यपालांचे प्रतिनिधी डॉ.सी.डी.माई, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर विविध विद्या शाखेचे अधीष्ठाता डॉ. एस. बी. रेवतरकर, डॉ. जी. एफ. सूर्या, डॉ. एस. एस. कावळे, डॉ. एस. एम. साकुरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, डॉ.प्रदीप घोरपडे, अजय लोंढे, डॉ.हंसा तोमर, डॉ. अनिल चिताडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. अनिल काकोडकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात विविध विषयात आचार्य पदवी उत्तीर्ण २१ प्रज्ञावंतांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विविध विषयात सुवर्णपदक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या एकूण १११ गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ३१ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी एसटीआरसी व उपकेंद्र उभारणे ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाचा निरंतर वापर हा ग्रामीण भागामध्ये उदरनिर्वाहाच्या संधी निर्माण करू शकतात. त्यामुळे एसटीआरसीच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठात सिलेज इको सिस्टीम सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले, विद्यापीठाने युजीसी १२ (ब) हा दर्जा प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या संदर्भात युजीसीच्या तज्ज्ञ समितीने विद्यापीठाच्या १२ (ब)च्या मुल्यांकनासाठी १८ व १९ डिसेंबर २०१९ रोजी भेट दिली. १२ (ब) चा दर्जा विद्यापीठाला प्राप्त होईल, असा विश्वास डॉ. कल्याणकर यांनी यावेळी व्यक्त केला. प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांमध्ये संशोधन वृत्ती वृध्दींगत होण्यासाठी एसटीआरसीच्या वतीने विविध उपक्रम राबविल्या जात असून यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावत आहेत, असे ते म्हणाले.विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सदर कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध नियोजनबद्ध व वेळेत पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, डॉ.शिल्पा आठवले यांनी केले.कार्यक्रमाला विद्यापीठाचे विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.२१ जणांचा आचार्य पदवीने गौरवगोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील तब्बल २१ जणांनी विविध विषयावर आचार्य पदवी उत्तीर्ण केली. या प्रज्ञावंतांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये सतिश कोला (रसायनशास्त्र), शरद जिचकार (बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅन्ड बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), सीमा सैंदाने (राज्यशास्त्र), राहूल चुटे (राज्यशास्त्र), चन्नागाला सत्यनारायण (ईलेक्ट्रिकल इंजिनिअरींग), शीतल खेकारे (प्राणीशास्त्र), पूजा खापर्डे (प्राणीशास्त्र), भगवान धोटे (राज्यशास्त्र), विलास गायधने (इतिहास), गिरीधर कुनघाडकर (अर्थशास्त्र), पंकज बेंडेवार (अर्थशास्त्र), वर्षा बनकर (रसायनशास्त्र), इशाक खान (गणित), अरूणा शेंडे (जीवशास्त्र), अश्विनी कडू (रसायनशास्त्र), रविकांत मिश्रा (गणित), प्रणव मंडल (रसायनशास्त्र), शहबाज हक (इंग्लिश), राजू पिदुरकर (रसायनशास्त्र), मेघराज दिवसे (रसायनशास्त्र), उज्वला सारडा (वाणिज्य) यांचा समावेश आहे.३१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदानसुवर्णपदक प्राप्त ३१ विद्यार्थ्यांमध्ये विकास आनंदराव मदनकर, कोमल तिवाडे, नुरसब्बा मुबशीरूद्दीन सय्यद, चारू मोरेश्वर बोरकर, श्वेता मधुकर धडसे, जोसेफ विलेश बोर्नवार, दहागावकर कोंडय्या देवीदास, श्वेता राजेंद्रसिंह गौतम, रक्षा रमेश नाकाडे, सचिन अंतराम तोफा, कविता विजय कानडे, भाग्यश्री ज्ञानदेव रहाटे, सुशीला शालिकराव गजभिये, ममता भगवान सारडा, शेख गौशीया ए जहीर, पायल सुरेश मून, चेतना निमदेव आगळे, चेना साहिती सत्यम, रिमा केवलराम मेंढे, सुषमा कामेश्वर प्रजापती, पूजा पद्माकर गंगमवार, अंकिता चंद्रशेखर सपाटे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदर सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ