अनेक ग्रामपंचायती माघारल्या : पाणीपट्टी करवसुली ४७ टक्क्यांवर गडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील मिळून एकूण ४५६ ग्रामपंचायतीकडे मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण १४ कोटी ७४ लाख ८२ हजार ७९० इतकी गृहकराची मागणी होती. यापैकी डिसेंबर २०१६ अखेर ७ कोटी १७ लाख ९६ हजार ७८३ इतकी कर वसुली करण्यात आली असून गृह कराच्या वसुलीची टक्केवारी ४८.६८ आहे. तर पाणी पट्टी कर वसुलीची टक्केवारी ४७.२६ इतकी आहे. गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीकडे ३१ मार्च २०१६ अखेर गृहकराची मागील थकबाकी म्हणून १ कोटी २४ लाख ८० हजार १७५ रूपये होते. सन २०१६-१७ या वर्षाची १ कोटी १३ लाख ४५ हजार २६२ रूपये गृहकराची मागणी होती. एकूण २ कोटी ३८ लाख २५ हजार ४३७ रूपये मागणीपैकी १ कोटी ४५ लाख १६ हजार ७३४ इतकी एकूण कर वसुली झाली. आरमोरी तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीकडे मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी ५१ लाख ३४ हजार ७४१ रूपयांची गृहकराची मागणी होती. यापैकी ७१ लाख ३२ हजार ८२५ रूपये कर वसुली झाली. देसाईगंज तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीकडे मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी ५२ लाख १७ हजार १९९ रूपयांची गृहकर मागणी होती. यापैकी ६१ लाख १९ हजार ९२९ रूपयांची गृहकर वसुली करण्यात आली. कुरखेडा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीकडे मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी ४० लाख २३ हजार ७४१ रूपये इतकी गृहकराची मागणी होती. यापैकी ४९ लाख ८ हजार ३०९ रूपयांची वसुली झाली आहे. कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीकडे जुनी थकबाकी व चालू वर्षाची मिळून २७ लाख ८४ हजार ३९३ रूपये गृहकराची मागणी होती. यापैकी १६ लाख १४ हजार ९४८ रूपये कर वसुली झाली. धानोरा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीकडे जुनी थकबाकी व चालू वर्षाची मिळून ८९ लाख २३ हजार ९०० रूपये गृहकराची मागणी होती. यापैकी ३८ लाख ४८ हजार ४५० रूपयांची कर वसुली झाली आहे. चामोर्शी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीकडे जुनी थकबाकी व चालू वर्षाची मिळून ३ कोटी ३४ लाख ८ हजार ७८५ रूपये गृहकर मागणी होती. यापैकी १ कोटी ४७ लाख ७५ हजार ५१४ रूपये इतकी गृहकर वसुली झाली. मुलचेरा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीकडे एकूण ६४ लाख ६५ हजार ६२२ रूपये गृहकराची मागणी होती. यापैकी डिसेंबर अखेर ३३ लाख ६२ हजार १२३ रूपये इतकी कर वसुली झाली. अहेरी तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीकडे जुनी थकबाकी व चालू वर्षाची मिळून १ कोटी ३१ लाख ७३ हजार ९९८ इतकी गृहकराची मागणी होती. यापैकी १ कोटी ९२ लाख ६ हजार ४२८ रूपये गृहकर वसुली झाली. एटापल्ली तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीकडे जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ३५ लाख ६७ हजार ४७८ रूपये इतकी गृहकर मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी १९ लाख २६ हजार ४२८ रूपये कर वसुली केली. सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीकडे एकूण ८४ लाख ५३ हजार ७९८ गृहकर मागणी होती. यापैकी ५७ लाख ९७ हजार ६९१ रूपयांची गृहकर वसुली झाली. भामरागड तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीकडे जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून २५ लाख ३ हजार ६९८ रूपये गृहकराची मागणी होती. यापैकी २१ लाख २९ हजार १३ रूपये कर वसुली झाली. (स्थानिक प्रतिनिधी)
गृहकर वसुली ४८ टक्के
By admin | Updated: February 4, 2017 02:09 IST