विठ्ठल-रखुमाई मंदिरात होमहवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST2021-02-05T08:47:58+5:302021-02-05T08:47:58+5:30

सिरोंचा : तालुका मुख्यालयालगत प्राणहिता नदीतीरावर वसलेल्या अतिप्राचीन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात शुक्रवार, २९ जानेवारी रोजी देवालय शुध्दीकरण, संप्रेक्षणा कार्यक्रम, ...

Homahavan in Vitthal-Rakhumai temple | विठ्ठल-रखुमाई मंदिरात होमहवन

विठ्ठल-रखुमाई मंदिरात होमहवन

सिरोंचा : तालुका मुख्यालयालगत प्राणहिता नदीतीरावर वसलेल्या अतिप्राचीन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात शुक्रवार, २९ जानेवारी रोजी देवालय शुध्दीकरण, संप्रेक्षणा कार्यक्रम, नवग्रह देवतांचे पूजन, होमहवन आदी कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला भाविकांची गर्दी उसळली हाेती.

काही दिवसांपूर्वी भगवान विठ्ठलाच्या मूर्तीवरील कपडे जळाले होते. त्यामुळे मंदिर ट्रस्टकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वा. संपूर्ण मंदिर धुऊन स्वच्छ करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत विधिवत सर्व कार्यक्रम पार पडले. सर्व कार्यक्रम कांकणधारण मंदिराचे पुजारी रवी चल्लावार यांनी सपत्निक पार पाडले. पौराेहित्य पंडित सचिन वेदांतम व तेलंगणाच्या चेन्नूर येथील श्रीनिवास शर्मा यांनी केले पूर्णाहुती व महाआरती झाली. यानंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी तोटावार, राजू पानेम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Homahavan in Vitthal-Rakhumai temple