गडचिराेली : विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शाळा महाविद्यालय तसेच प्रशासनाच्या विविध कार्यालयांतर्फे ९ ऑगस्ट हा क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील क्रांतिकारकांच्या बलिदान व याेगदानाला उपस्थित मान्यवरांनी भाषणातून उजाळा दिला.
आदिवासी संघटना, मरेगाव
येथे कार्यक्रमाच्या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य तथा साहित्यिक कुसुम अलाम हाेत्या. उद्घाटन पं. स. सभापती मारोतराव इचोडकर यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून पं. स. उपसभापती विलास देशमुख, पं. स. सदस्य रामरतन गाेहणे उपस्थित हाेते. आदिवासी संस्कृती, नैसर्गिक संसाधन वाचवणे, वर्तमानात आदिवासींच्या समस्या यावर विस्तृत मार्गदर्शन कुसुम अलाम यांनी केले. आदिवासींनी भाषेचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत दशमुख यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मालता अलाम, सेवानिवृत्त शिक्षक खेवले, नरेश आलाम आदी उपस्थित हाेते. प्रास्ताविक नेताजी अलाम यांनी केले, सूत्रसंचालन करून आभार भोला मेश्राम यांनी मानले. यावेळी प्रतीक्षा सिडाम, प्रेरणा सिडाम, मयुरी अलाम यांनी आदिवासी गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी आशा अलाम, पाेलीस पाटील अण्णाजी कुलसंगे व गावातील नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.