शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यातील नऊ तालुक्यात अतिवृष्टी; पर्लकोटा नदीला पूर, शंभरावर गावांचा संपर्क तुटला

By मनोज ताजने | Updated: September 12, 2022 11:33 IST

२४ तासात ८६.६ मिमी पावसाची नोंद; ८ मार्गावरील वाहतूक बंद

गडचिरोली : जिल्ह्यात सर्वदूर पावसाने पुन्हा एकदा जोरदार धडक दिली आहे. गेल्या २४ तासात ८६.६ मिमी पाऊस बरसल्याने नदी आणि नाल्यांची पातळी चांगलीच वाढली आहे. ठेंगणे पूल पाण्याखाली आल्याने ८ मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. 

रविवारी दिवसभर अधूनमधून रिमझिम पावसाची सर येत होती, पण रात्री पावसाने चांगलाच जोर पकडला. मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हाहाकार उडाला. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली -गुरवाळा, माडेमुल-रनमुल, चांदाळा-कुंभी, धानोरा-सोडे, पेंढरी-पाखांजुर, साखरा-कारवाफा, लाहेरी-बिनागुंडा (गुंडेनुर नाला), आलापल्ली -ताडगांव-भामरागड(कुडखेडी नाला, पेरीमिली नाला, पर्लकोट नदी) आदी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात ९ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस असा आहे. गडचिरोली ११७.१ मिमी, कुरखेडा ८८.०, आरमोरी ७०.९, चामोर्शी ८४.४, सिरोंचा ६०.०, अहेरी १०५.६, एटापल्ली ६१.३, धानोरा ११५.९, कोरची ११३.७, देसाईगंज ६०.५, मुलचेरा ७८.४, आणि भामरागड तालुक्यात ८३.४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. छत्तीसडमध्ये रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे इंद्रावती, पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळे भामरागडलगतचा पूल पुन्हा एकदा पाण्याखाली जाऊन शंभरावर गावांचा संपर्क तुटला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरweatherहवामानgadchiroli-acगडचिरोली