शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विसापुरात अस्वच्छतेचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग, घंटागाडी केव्हा येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 14:57 IST

नागरिकांचा सवाल : नगरसेवक नाही, तक्रार करायची कुणाकडे?

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : स्थानिक नगरपरिषद प्रशासनाद्वारे शहरातील सर्वच वार्डात स्वच्छ शहर, समृद्ध शहर असा डंका पिटवत स्वच्छतेबाबत पाठ थोपटली जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील काही वार्डात अस्वच्छतेमुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. न. प. हद्दी अंतर्गत येत असलेल्या विसापूर येथे सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून वार्डा वार्डात पसरलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नगर पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी रहिवासी यांच्याकडून होत आहे.

नगर पालिका हद्दीत विसापूर हा भाग येत असून या गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. विसापूर-कोटगल या मुख्य मार्गावरच कचरा पसरल्याने येथे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच मार्गावर नगर परिषदेची शाळा सुरू आहे. तसेच प्रशासनाने या गावात अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गावात रस्ते, नाले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे नगर परिषदेची कचरा उचलणारी वाहने गावात नियमित पोहोचत नसल्याने गावात कचरा पसरला आहे. विशेषतः विसापूर-कोटगल रस्त्यावर रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, न. प. च्या उदासीनतेमुळे समस्या 'जैसे थे'च आहे. नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न