शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
2
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
3
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
4
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
5
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
6
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
7
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
8
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
9
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
10
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
11
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
12
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
13
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
14
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
15
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
16
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
17
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
18
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
19
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
20
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

जिमलगट्टात १,३४२ जणांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

दुर्गम भागातील नागरिक अनेक आजारांनी त्रस्त राहतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सदर नागरिक उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे दु:खाचे जीवन कंठावे लागते, ही बाब लक्षात घेऊन एफडीसीएमने जिमलगट्टा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील गावखेड्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देशिबिर : एफडीसीएमचा पुढाकार, परिसरातील गावखेड्यातील नागरिकांनी केली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : एफडीसीएम सीएसआर ट्रस्ट व दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिमलगट्टा येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान १ हजार ३४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.आरोग्य शिबिराचे उद्घाटन एफडीसीएम नागपूरचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एफडीसीएमचे डॉ. एम. रानबाबू होते. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय व्यवस्थापक एस. आर. पाटील, महाव्यवस्थापक ऋषीकेष रंजन, सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमीत कुमार, वन परिक्षेत्राधिकारी भोयर, प्रशील जुमडे, डीएफओ नवलकिशोर रेड्डी, सहायक व्यवस्थापक मुंडे, सुधीर शिंपले, पटलवार, सहायक व्यवस्थापक पंकज उईके, सरपंच सरीता गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.दुर्गम भागातील नागरिक अनेक आजारांनी त्रस्त राहतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सदर नागरिक उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे दु:खाचे जीवन कंठावे लागते, ही बाब लक्षात घेऊन एफडीसीएमने जिमलगट्टा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील गावखेड्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काही नागरिकांना गंभीर आजार असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वर्धा व इतर ठिकाणी पाठविण्यात आले आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना नागरिकांच्या आरोग्यासाठी शासनाने अनेक योजना लागू केल्या आहेत. महात्मा फुले योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अनेक रोगांवर मोफत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन उपचार करावे, असे आवाहन केले. संचालन आनंद अलोणे तर आभार दत्तात्रय कुकडे यांनी मानले.४५० रूग्णांवर उपचारयापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी जिमलगट्टा येथेच आरोग्य तपासणी शिबिर घेऊन १ हजार १५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ४५० रूग्णांना गंभीर आजार आल्याचे आढळून आले. त्यांना सावंगी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. हा सर्व खर्च एफडीसीएमच्या सीएसआर फंडातून करण्यात आला आहे.नागरिकांच्या लागल्या रांगाआरोग्य तपासणी शिबिरासाठी गावखेड्यातून शेकडो नागरिक उपस्थित होते. त्यामुळे तपासणी शिबिर ठिकाणी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वृध्द नागरिक, महिलांनीही सुध्दा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स