शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी करून दाखविले, आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:22 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचे परवा उद्घाटन झाले. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली.

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचे परवा उद्घाटन झाले. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. महाराष्ट्राच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणे अशक्य होते याची पुरती जाणीव ठेवत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे भरभरून आभार मानले. त्यांच्या आभाराने आपले मुख्यमंत्रीही गदगदून गेले. पण त्या भल्यामोठ्या प्रकल्पातून आपल्या शेतकऱ्यांना किती पाणी देणार आणि कधी देणार हे मात्र मुख्यमंत्री सांगायचे विसरले.या प्रकल्पाच्या पाण्याने तेलंगणा राज्यातील १८.२४ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. त्या १८.२४ लाख हेक्टरमध्ये महाराष्ट्रातील एकही हेक्टर जमीन नाही. या प्रकल्पातून तीन मोठे कालवे असतील आणि त्यातून विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील ४० हजार एकर शेतीला सिंचन होईल असा करार महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारमध्ये झाल्याचे चित्र बाहेर रंगविण्यात आले. पण त्यात किती तथ्य आहे हे करार करणाऱ्यांनाच माहीत. जर तसे असते तर त्या कालव्यांचे काम कोण करणार? कधी करणार? आतापर्यंत किती काम केले? कुठे केले? केले नसेल तर का नाही केले? असे कितीतरी प्रश्न सिंचनासाठी तडफडणाºया शेतकºयांच्या मनात उमटत आहेत. मात्र त्यांचे उत्तर कोणीही देण्यासाठी आतापर्यंत पुढे आलेले नाही.तेलंगणातल्या १८.२४ लाख हेक्टर शेतीला पाणी पुरवणाºया या ८८ हजार कोटींच्या भल्यामोठ्या प्रकल्पाचे काम अवघ्या तीन वर्षात पूर्ण झालेच कसे? असा आश्चर्यकारक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेलाच नाही तर नेत्यांनाही पडला असणार. कारण एवढा प्रकल्प बांधण्यासाठी महाराष्ट्रात किमान १५ ते २० वर्ष आरामात लागले असते. सिरोंचा तालुक्यात मंजूर असलेल्या टेकडा, पेंटीपाका, रंगयापल्ली किंवा आष्टीजवळील तुमडीहेटी या अवघ्या काही कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांची सद्यस्थिती पाहिल्यानंतर अशा प्रकल्पांच्या उभारणीसाठी महाराष्ट्रात किती वर्षे लागत असतात याची कल्पना येते. कालेश्वरम प्रकल्पाच्या आधी मंजूर असणाºया अनेक प्रकल्पांच्या कामाला महाराष्ट्रात अनेक वर्षेपर्यंत सुरूवातही होत नाही, पण तेलंगणा सरकार हजारो कोटींचा प्रकल्प विक्रमी वेळेत बांधून पूर्ण करून दाखवते याला काय म्हणायचे? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव की नियोजनशून्य कारभार?वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठे प्रकल्प होऊ शकत नाही. परिणामी बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पण मोठ्या नद्यांची देण असताना त्यावर ठिकठिकाणी बॅरेज बांधल्यास वनकायद्याची फारशी अडचण न येताही बरीच शेती बारमाही सिंचनाखाली येऊ शकते. ही बाब आपल्या नेत्यांना कळत नाही असेही नाही. कळते पण वळत नाही, ही अडचण आहे. सरकारदरबारी भांडून निधी खेचून आणण्याची तळमळ नाही. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असताना सरकारदरबारी वजन वापरले जात नाही, की वजन पडतच नाही, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती वाईट आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgodavariगोदावरी