शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्हाभरात ‘हर हर महादेव’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 6:00 AM

मार्र्कंडा जत्रेत खेळण्यांची दुकाने व करमणुकीची विविध साधने राहत असल्याने शिवभक्तांसोबतच बच्चेकंपनीलाही सदर यात्रा आकर्षीत करते. महाशिवरात्रीच्या सुटीनंतर दुसरा शनिवार व रविवारची सुटी असल्याने तीन दिवस जत्रेत भाविकांची गर्दी राहिल. अमावस्येनंतर ग्रामीण भागातील नागरिक वैनगंगेत पिंडदान करण्यासाठी येतात. रविवारी अमावस्या आहे. त्यामुळे रविवारनंतर पुन्हा चार ते पाच दिवस भाविकांची गर्दी राहिल.

ठळक मुद्देमार्कंडात उसळली गर्दी : ठिकठिकाणच्या शिवालयांमध्ये लागल्या भाविकांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील पुरातन मार्र्कंडादेवसह अनेक ठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारपासून जत्रेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी लाखो शिवभक्तांच्या रांगा लागल्या होत्या. मार्र्कंडादेव येथे शिवमंदिरालगत वाहणाऱ्या उत्तरवाहिनी वैनगंगेतून मार्ग काढत पैलतिरावरील भाविकांनी मार्कंड्यात येऊन दर्शन घेतले.मार्र्कंडा येथील अतिशय पुरातन मंदिराच्या परिसरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त आठ दिवसांची जत्रा भरते. या जत्रेला राज्यभरातून लाखो भाविक येत असल्याने प्रशासनामार्फत सुविधा निर्माण केल्या आहेत. शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते शिवलिंगाची पूजा करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, त्यांच्या पत्नी बिनाराणी होळी, पुजेचा मान मिळालेले पंकज पांडे, त्यांच्या पत्नी शुभांगी पांडे, माजी आमदार रामकृष्ण मडावी, जि.प. सभापती रमेश बारसागडे, त्यांच्या पत्नी कविता बारसागडे, मार्र्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामूजी तिवाडे, वरिष्ठ संरक्षण अधिकारी भाऊसाहेब शिंदे, तहसीलदार संजय गंगथडे, बिडीओ नितेश माने, शिवसेना जिल्हा प्रमुख राजगोपाल सुलवावार, सरपंच उज्वला गायकवाड, अरविंद कात्रटवार, सुनील पोरेड्डीवार, रामकिरीत यादव, अश्विनी यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.मार्र्कंडा जत्रेत खेळण्यांची दुकाने व करमणुकीची विविध साधने राहत असल्याने शिवभक्तांसोबतच बच्चेकंपनीलाही सदर यात्रा आकर्षीत करते. महाशिवरात्रीच्या सुटीनंतर दुसरा शनिवार व रविवारची सुटी असल्याने तीन दिवस जत्रेत भाविकांची गर्दी राहिल. अमावस्येनंतर ग्रामीण भागातील नागरिक वैनगंगेत पिंडदान करण्यासाठी येतात. रविवारी अमावस्या आहे. त्यामुळे रविवारनंतर पुन्हा चार ते पाच दिवस भाविकांची गर्दी राहिल.पुजेच्या वेळी नंदू कुमरे, अमित यासलवार, विलास ठोंबरे, दिलीप चलाख, छाया कुंभारे, साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, चेतन फुंडकर, वैशाली भांडेकर, संजय वडेट्टीवार, विस्तार अधिकारी डी. पी. भोगे, पराग आर्इंचवार, अमृता आर्इंचवार, सोनाली बोगीनवार, अशोक तिवारी, नाना आमगावकर, राजू गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने जिल्हाभरातील नद्यांमध्ये पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती.जत्रा परिसरात ५० ध्वनीक्षेपकजत्रेसंदर्भातील सूचना देण्यासाठी मार्कंडेश्वर मंदिर परिसर ते शेवटच्या टोकापर्यंत सुमारे ५० ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शिवलिंगस्थळाचे दर्शन एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून दिले जात आहे. आग वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी अहेरी नगर पंचायतीचे अग्निशनम वाहन आहे. मंदिर सुरक्षेकरिता १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती भारतीय पुरातत्व विभागाकडून केली आहे. आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.पहिले मानकरी जितेंद्र कोवे यांचा सत्कारदर्शनाच्या रांगेतून पहिला येण्याचा मान जितेंद्र कोवे यांनी पटकाविला. त्यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ६ वाजेपासून दर्शनाला सुरूवात झाली. मार्र्कंडेश्वर देवस्थानतर्फे शिवभक्तांसाठी उपवासाच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.सफाईसाठी २० कर्मचाऱ्यांची नेमणूकमार्र्कंडा मंदिर परिसर व जत्रा परिसरात स्वच्छता करण्यासाठी पंचायत समितीने २० सफाई कामगारांची नेमणूक मार्र्कंडादेव येथे केली आहे. महिलांसाठी कपडे बदलविण्याची रूम बनविली आहे. आंघोळीसाठी शॉवर, स्तनपानगृह, हरविलेल्या मुलांसाठी केंद्र निर्माण केले आहे. मार्र्कंडा परिसरात हजार लिटर पाणी क्षमतेच्या चार टाक्या बसविल्या आहेत. ग्रामपंचायतीकडून २४ तास शुध्द पाणी पुरविले जात आहे. मार्र्कंडादेव परिसरात कायमस्वरूपी ४० शौचालय व स्नानगृह आहेत.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री