शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नगरपंचायतीवर धडकला महिलांचा हंडा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:42 IST

अहेरीत आंदोलन : नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांविरोधात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील नगरपंचायतीअंतर्गत प्रभाग क्र. १६ व १७ मध्ये पाण्याची समस्या बिकट आहे. ७ मे रोजी महिलांनी हंडे घेऊन नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.

नगरपंचायत कार्यक्षेत्रात येत असलेल्या प्रभाग क्र.१६ व १७ मौजा चेरपल्ली व गडअहेरी या जवळपास दोनशे पेक्षा अधिक कुटुंबांच्या वस्त्या आहेत. २०१४ पूर्वी नळ जोडणी केलेली होती. गावात दोन हातपंप असून त्यापैकी एक बंद आहे. सन २०२१ पूर्वी महिन्यातून फक्त दहा दिवसच नियमित पिण्याचे पाणी सोडले जात होते. दोन ते अडीच वर्षांपासून मौजा गडअहेरी या गावाला ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय अहेरीमार्फत नियमित पाणी दिले जात नव्हते. नगरपंचायत प्रशासनाला निवेदने देऊन, विनंती करूनसुद्धा पाणी पुरवठा होण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाही. त्यामुळेमंगळवारी संतप्त महिलांनी मोर्चा काढला.

यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सुनीता दुर्गे, लक्ष्मी आत्राम, आकांक्षा ओडरे, अलका मराठे, सुनीता राऊत, सिद्धू वाघाडे, मोनाबाई आयल, साधना मेश्राम, शारदा आत्राम, रोहिणी आयदोल, कमला आत्राम, हिंगोली आत्राम, प्रेमीला आत्राम, कोमल गलबले, सरिमा गलबले, भाग्यश्री आत्राम, संगीता राऊत, लता राऊत, सुरेखा राऊत, संगीमा गलबले राहुल दुर्गे, अॅड. पंकज दहागावकर, कुणाल मेश्राम, भारत गलबले, विनोद दहागावकर, सचिन दुर्गे आदी उपस्थित होते. लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

गडअहेरी भागात व समस्या असल्या ठिकाणी ग्रामीणपाणी पुरवठा कार्यालयामार्फत पाण्याचा पुरवठा केला जाईल. तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत, याकडेही लक्ष आहे. आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.जोरदार- अनिल दाते, मुख्याधिकारी, न.पं.

 

टॅग्स :tumsar-acतुमसरGadchiroliगडचिरोलीwater scarcityपाणी टंचाई