शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या; नक्षलनेत्याच्या नातेवाइकांची विनंती, आंध्र प्रदेशात याचिका

By गेापाल लाजुरकर | Updated: May 25, 2025 19:28 IST

न्यायालय म्हणते, छत्तीसगड पाेलिसांकडे मागणी करा

गडचिरोली : भाकपा (माओवादी)चा सरचिटणीस तथा नक्षल्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव ऊर्फ बसवा राजू याचा खात्मा २१ मे राेजी छत्तीसगड राज्यातील अबुझमाड जंगलातील चकमकीत झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात न आल्याने नातेवाइकांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दाेन याचिका दाखल करीत मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. या याचिकेवर शनिवार, २४ मे रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने छत्तीसगड पाेलिसांकडे मृतदेहासाठी मागणी करावी, असे मत नाेंदवित याचिका निकाली काढली.

छत्तीसगडमधील अबुझमाड जंगल परिसरात २७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला हाेता. यात बसवा राजूचाही समावेश हाेता. बसवा राजूच्या खात्म्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीयांनी धडपड सुरू हाेती. मात्र, शवविच्छेदनासह इतर तपासण्यांचे कारण देत त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलेला नव्हता. छत्तीसगड पाेलिसांकडून हाेत असलेला विलंब लक्षात घेऊन बसवा राजूच्या नातेवाइकांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दाेन याचिका दाखल करीत मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली.

महाधिवक्ता म्हणतात... मृतदेह लवकरच देणारशनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेत याचिकाकर्त्यांना मृतदेहासाठी छत्तीसगड पोलिस प्रशासनाकडे मागणी करण्याची सूचना केली. यावेळी छत्तीसगडच्या महाधिवक्त्यांनीही लवकरच शवविच्छेदन आणि तपासणी पूर्ण होणार असल्याचे सांगून मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करणार, असे न्यायालयात सांगितले.

अंत्ययात्रा उत्सवाची पाेलिसांना धास्ती?गडचिरोली जिल्हा व छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपविल्यानंतर शांततेत अंत्यसंस्कार पार पाडले जातात. मात्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मृत नक्षल नेत्यांची अंत्ययात्रा वाजतगाजत, गाणी गात काढली जाते. सामान्य लाेकांसह समविचारी राजकीय पुढारीसुद्धा अंत्ययात्रेत माेठ्या संख्येने सहभागी हाेतात. उत्सवाप्रमाणे अंत्यविधी पार पाडला जाताे. गत महिन्यात महिला नक्षलीच्या अंत्ययात्रेचे फाेटाे व व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाले हाेते. बसवा राजू हा माेठा नक्षली नेता असल्याने कदाचित याचीच धास्ती पाेलिसांना असावी, असाही कयास लावला जात आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी