शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

अर्धा जिल्हा पुराच्या कवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणांचे पाणी वैनगंगा नदीत सोडले जात आहे. भंडारा जिल्ह्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता २३,२८९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र मध्यप्रदेश राज्यातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढतच गेल्याने रविवारी सकाळी पुन्हा दरवाजे उचलून २६,०६५ क्यूमेक्स विसर्ग सुरू होता.

ठळक मुद्दे१९९४ नंतरचा सर्वात मोठा पूर : अनेक गावांमध्ये शिरले पुराचे पाणी, ७०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोसेखुर्द धरणातून रेकॉर्डब्रेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी, गडचिरोली तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी गडचिरोलीतून जाणारे अनेक प्रमुख मार्ग बंद होते. पाण्याचा विसर्ग वाढत चालला असल्याने सोमवारी पुन्हा पूर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणांचे पाणी वैनगंगा नदीत सोडले जात आहे. भंडारा जिल्ह्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता २३,२८९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र मध्यप्रदेश राज्यातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढतच गेल्याने रविवारी सकाळी पुन्हा दरवाजे उचलून २६,०६५ क्यूमेक्स विसर्ग सुरू होता. रविवारी सायंकाळी पुन्हा गोसेखुर्द धरणाचे १३ दरवाजे पाच मीटरने तर २० दरवाजे ४.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून ३०,५८९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी जास्त पाणी सोडण्यात आले. वाढलेले पाणी गडचिरोली पर्यंत सोमवारी पोहोचणार आहे. त्यामुळे पूर पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, गोसेखुर्द धरणाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.१९९४ मध्ये सर्वात मोठा पूर आला होता. त्या पुरानंतर यावर्षीचा सर्वात मोठा पूर आहे. असे वयस्क नागरिकांकडून सांगितले जात आहे. अनेक गावांच्या नदी काठापर्यंत पाणी पोहोचले असल्याने गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागणार आहे. तसेच गावकºयांनी जनावरे मोकळे सोडून दिली आहेत.पुरात अडकलेल्या वृध्द दाम्पत्याला काढलेकुरूड : कोंढाळा येथील लालाजी आडे व त्यांची पत्नी शेतात राहत होते. शेतातील झोपडीत वास्तव्य करीत होते. २९ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या झोपडीला पाण्याने वेढले. गावाकडे येण्याचा प्रयत्न केला. मात्र चारही बाजुने पुराने वेढा घातला होता. त्यामुळे संपूर्ण रात्र झोपडीवर बसून काढली. पुराच्या पाण्यात झोपडीतील साहित्य, कोंबड्या, शेळ्या वाहून गेल्या. दुचाकी पुरातच अडकली आहे. रविवारी आपत्ती व्यवस्थापन पथकाने झोपडीपर्यंत बोट नेऊन लालाजी आडे, त्यांची पत्नी व हिरामण बुराडे यांना पूरातून बाहेर काढले. एसडीओ विशालकुमार मेश्राम, तहसीलदार दीपक बुटे, नायब तहसीलदार आर. डी. नैताम, पोलीस विभागाचे मोहनदास सयाम, राकेश देवेवार, राजेश शेंडे, सिताराम लांजेवार, अशोक कराडे, कृष्ण जुवारे, बोट चालक वैदिक शेख, प्रेमकुमार भगत, वनरक्षक सलिम सय्यद, पोलीस पाटील किरण कुंभलवार, सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार, उमेश राऊत यांनी प्रयत्न केले.देसाईगंजातील ४०० घरांना फटकापुराचे पाणी देसाईगंज शहरातील जवळपास ४०० घरांमध्ये शिरले आहे. यापूर्वी १९९४ मध्ये हनुमान वार्ड पाण्याखाली आला होता. त्यानंतर यावर्षी फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. लाखांदूर मार्गालगत आशिर्वाद कॉलनी व ब्रह्मपुरी मार्गालगत विद्यानगर या नावाने लेआऊट पाडून घरे बांधण्यात आली. या वस्तीला यावर्षीच फटका बसला. त्यामुळे या परिसरात नव्याने घर बांधणाºयांमध्ये असुरक्षततेची भावना निर्माण झाली आहे. १९९४ मध्ये देसाईगंज-लाखांदूर मार्गावरील बैद्यनाथ कारखाना, मारोती राईसमिल, बायपास मार्गावरील हनुमान वार्ड पाण्याखाली आला होता. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नवीन लेआऊट पाडून विकले जात आहेत. नागरिक प्लाट घेतेवेळी पूर परिस्थितीचा विचार करीत नाही. त्यामुळे आपत्तीला तोंड द्यावे लागते. देसाईगंज-आमगाव मार्गालगतच्या हनुमान वार्डातील नवीन वस्तीतील अंदाजे २०० घरे व गांधी वार्डातील सहारे हॉस्पीटलच्या मागील बाजूस असलेल्या नवीन लेआऊटमधील २०० घरे पुराने वेढले आहेत. यातील काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.सावंगी व देसाईगंजातील ५२ कुटुंबांना हलविलेदेसाईगंज तालुक्यातील सावंगी हे गाव अगदी वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. या गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने २० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तसेच देसाईगंज शहरातील हनुमान वार्डातील धर्मपुरी परिसरातही पुराचे पाणी जमा झाले. त्यामुळे ३२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊस