कोरेगाव/चोप : देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा येथे तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने खरीप हंगामपूर्व शेतकरी सभेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. हनुमान मंदिर सभागृहात पार पडलेल्या शेतकरी सभेत धानाची ‘o्री’ पध्दतीने लागवड तसेच रासायनिक खते, बी, बियाणे व कृषी विभागाच्या अनेक योजनांविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी एस. जे. गोथे, मंडळ कृषी अधिकारी पी. डी. गुल्हाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पी. डी. गुल्हाने यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, केळी व पपई लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या विषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी एस.जे. गोथे यांनी तालुक्यात घेण्यात येणार्या भात पिकाविषयी मार्गदर्शन केले. तसेच धानाचे पारंपरिक पध्दतीने घेण्यात येणारे उत्पादन, यामध्ये शेतकर्यांना येणारा अधिकचा खर्च व वेळ वाया जातो. परिणामी उत्पादनही कमी येते. शेतकर्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने o्री पध्दतीने भात लागवड करून उत्पन्न वाढविण्याकरिता मार्गदर्शन केले. रासायनिक खताकरिता शेतकर्यांनी गटस्थापना करून आपली मागणी कृषी सहाय्यकांकडे नोंदवावी व अपघात विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण या विषयी माहिती देण्यात आली. आत्मा अंतर्गत प्रशिक्षण अभ्यास दौरे, शेतीला पुरक व्यवसाय, नाविण्यपूर्ण उपक्रम, शिंगाडे उत्पादन, अँपल, बोर लागवड या विषयी आत्माचे एच. एस. शहारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कोंढाळाचे कृषी सहाय्यक व्ही. एम. शेंडे तर आभार किन्हाळाचे कृषी सहाय्यक व्ही. एन. झडते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक कुरूडचे एन. सी. कुंभारे, वडसाचे कृषी पर्यवेक्षक बी. एस. देशमुख यांनी सहकार्य केले. शेतकरी सभेला देसाईगंज तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. शेतकर्यांना खरीप हंगामातील पूर्व तयारी विषयी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
किन्हाळात ‘o्री’ पध्दतीचे मार्गदर्शन
By admin | Updated: June 4, 2014 00:05 IST