शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आरमाेरी तालुक्यात २३१.८० हेक्टर क्षेत्रात हाेणार भुईमूग पिकाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 23:15 IST

नद्यांच्या किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील कढाेली, सावरखेडा, कराडी, सोनेरांगी, खरकाडा, भगवानपूर, वाढोणा या गावांत तर आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, करपडा, मोहझरी, सुकाळा या नदीकाठाच्या गावांत मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. भुईमूग हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या तेलबियांची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे पीक असून, काळाच्या ओघात या पिकाचे महत्त्वदेखील वाढत आहे. या पिकाला निरनिराळ्या हवामानात जुळून घेण्याची क्षमता असल्याने या पिकाचे दिवसेंदिवस लागवड क्षेत्रदेखील वाढत आहे. सन २०२१ -२२ या वर्षात रब्बी हंगामात आरमोरी तालुक्यात भुईमूग पिकाचे लागवड क्षेत्र २३१.८०  हेक्टर क्षेत्र असून, यंदा गडचिराेली जिल्ह्यातदेखील भुईमुगाचा पेरा वाढणार आहे.यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने बाह्य मशागतीच्या कामाला उशीर झाला. १५ ऑक्टोबरपर्यंत पेरणी झाल्यास  फुलाचा कडाक्याच्या थंडीचा काळ सापडत नाही त्यामुळे चांगले उत्पादन येते. पण या वर्षात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे रबी पिकाला लागवडीसाठी उशीर झाला. या वर्षात आक्टोबर महिना संपत आला तरी अजूनपर्यंत काही शेतकरी बाह्य मशागतीच्या नांगरणीचे काम करीत आहेत. उशीर झाला असला तरी या उत्पादनात काही फरक पडणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.मध्यम, चांगल्या,  भुसभुशीत चिकण मातीच्या जमिनीत हे पीक चांगले येत असल्याने या स्वरूपाच्या मातीचा नदीकाठ खोब्रागडी, वैलोचना, सती नदीला लाभला. या तिन्ही नद्या कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी  तालुक्यांतील काही गावांजवळून वाहतात. या नद्यांच्या किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील कढाेली, सावरखेडा, कराडी, सोनेरांगी, खरकाडा, भगवानपूर, वाढोणा या गावांत तर आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, करपडा, मोहझरी, सुकाळा या नदीकाठाच्या गावांत मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते.भुईमूग हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या तेलबियांची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेतकऱ्याला चांगला भाव मिळत असून, भुईमूग उत्पादक शेतकरी आता आर्थिक उन्नतीकडे वाटचाल करत आहेत, म्हणून या पीक पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. 

शेतकऱ्यांनी परंपरागत भुईमुगाचे बियाणे न वापरता सुधारित वाण तसेच टपोरे दाण्यांचे बियाणे वापरल्यास उत्पादन  भरघोस येते. म्हणून शेतकऱ्यांनी आता भुईमुगाच्या नव्या शेतीकडे वळावे. या बियांना बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च भरून तर निघतेच, शिवाय शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धीदेखील होते.- जोत्स्ना घरत, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी