लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कमलापूर व परिसरातील अनेक लाभार्थ्यांनी मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. परंतु यातील अनेक लाभार्थ्यांना अद्यापही दुसरा व तिसरा अनुदानाचा हप्ता मिळाला नाही. उसनवार करून या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. परंतु अनुदान रखडल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट कोसळले आहे.कमलापूर परिसरातील अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. परंतु या लाभार्थ्यांना अद्यापही अनुदानाचा तिसरा हप्ता मिळाला नाही. विशेष म्हणजे या भागातील अनेक लाभार्थी शेतमजुरी किंवा अन्य रोजंदारीची कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. २०१३-१४ मध्ये अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले.कमलापूर येथील सितम्मा मुकेश आत्राम यांनीही घरकूल बांधकाम पूर्ण केले. त्यांना दोन हप्ते देण्यात आले. परंतु तिसरा हप्ता मिळाला नाही. त्यांनी अनेकदा ग्राम पंचायत व पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारले. व तिसरा हप्ता काढण्याची मागणी केली. परंतु काहीच उपयोग झाला नाही. ज्या लोकांनी घराचे बांधकाम पूर्ण केले नाही, अशांना पंचायत समिती प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात आले आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांनी घरकूल बांधकाम पूर्ण केले. त्यांना प्रशासन अनुदान देण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे सितम्मा आत्राम यांच्यासह अनेक लाभार्थ्यांनी घरकुलासह शौचालयाचेही बांधकाम पूर्ण केले आहे. परंतु या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने गंभीर बाबीची दखल घेऊन रखडलेले अनुदान निकाली काढावे, अशी मागणी कमलापूर व परिसरातील घरकूल लाभार्थ्यांनी केली आहे.
घरकुलाचे अनुदान रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:10 IST
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कमलापूर व परिसरातील अनेक लाभार्थ्यांनी मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. परंतु यातील अनेक लाभार्थ्यांना अद्यापही दुसरा व तिसरा अनुदानाचा हप्ता मिळाला नाही.
घरकुलाचे अनुदान रखडले
ठळक मुद्देकमलापूर परिसर : तिसरा हप्ता न मिळाल्याने लाभार्थी संकटात