शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मूलभूत सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:32 PM

रस्ता, सिंचन यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यावर शासनाचा विशेष भर आहे. मागील ७० वर्षात जेवढा निधी प्राप्त झाला नाही, त्यापेक्षाही अधिक विकास निधी आपल्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : गडचिरोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रस्ता, सिंचन यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यावर शासनाचा विशेष भर आहे. मागील ७० वर्षात जेवढा निधी प्राप्त झाला नाही, त्यापेक्षाही अधिक विकास निधी आपल्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ खा. अशोक नेते यांच्या हस्ते रविवारी झाला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, नंदू काबरा, सुधाकर येनगंधलवार, प्रकाश अर्जुनवार, डी.के.मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सावली तालुक्यातील व्याहाडजवळून सुरुवात झाली. हे काम गडचिरोली जिल्ह्यातील पूलखल फाट्यापर्यंत सुरू आहे. त्यानंतर आता गडचिरोली शहरातूनही कामाला सुरुवात होणार आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते म्हणाले, आपण आमदार असतेवेळीपासून सिंचन, रस्ता, रेल्वे, वनपट्टे यासाठी पाठपुरावा केला. भाषणादरम्यानही या सुविधा मिळाव्या, यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे सांगत होतो, त्यावेळी विरोधक माझे हसे उडवत होते. मात्र आता आपल्या प्रयत्नांना यश मिळाले असून गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश राज्य मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले आहे. एवढेच नाही तर भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या लाहेरीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग पोहोचला आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय सामान्य जनतेचा विकास होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन आपण अगदी सुरुवातीपासून या बाबीसाठी लढा दिला, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.आ.डॉ.देवराव होळी यांनी मार्गदर्शन करताना राज्य शासन व केंद्र शासन गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले. संचालन नगरसेवक रमेश भुरसे तर आभार सुधाकर येनगंधलवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते