शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयद्रावक... गोठणगाव गहिवरले; शिक्षक भावंडांचा १२ दिवसांच्या अंतराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 13:29 IST

कुरखेडा येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली. संजय टेमसूजी बगमारे (५५) व नंदकिशोर टेमसूजी बगमारे (५३) अशी मयतांची नावे आहेत

सिराज पठाण/ कुरखेडा

एकाच शाळेत होते कार्यरत: कुटुंबावर दु:खाचा डोंगर कुरखेडा (जि.गडचिरोली): एकाच शाळेत ज्ञानदानाचे काम करणाऱ्या दोन शिक्षकांचा १२ दिवसांच्या अंतराने मृत्यू झाला. त्यामुळे गोठणगाव गहिवरुन गेले. मोठ्या भावाचा १२ व्या दिवशी विधी सुरु असतानाच धाकट्याच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

कुरखेडा येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली. संजय टेमसूजी बगमारे (५५) व नंदकिशोर टेमसूजी बगमारे (५३) अशी मयतांची नावे आहेत. मूळचे पळसगाव (ता.कुरखेडा) येथील बगमारे बंधू शिक्षण घेऊन शिक्षक झाले. पुढे ते नोकरीनिमित्त कुरखेडा शहरात स्थायिक झाले. दरम्यान, ते दोघेही गोठणगाव (ता.कुरखेडा) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. २३ एप्रिल रोजी संजय बगमारे यांचा मृतदेह शहरालगतच्या एका शेतातील पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांनी आत्महत्या केली की विहिरीत पडून मृत्यू झाला, याचे गूढ कायम आहे. अशातच ४ मे रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने नंदकिशोर बगमारे यांचा मृत्यू झाला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कुटुंबियांनी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डाक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले.कुटुंबावर दुहेरी आघात

१२ दिवसांतच दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने गोठणगाववर शोककळा पसरली आहे. कुरखेडा शहरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघेही विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात. त्यांच्या जाण्याने विद्यार्थ्यांनाही शोक अनावर झाला होता. संजय बगमारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तर नंदकिशोर यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे. दुहेरी आघात झाल्याने कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAccidentअपघातDeathमृत्यू