कोरचीच्या दुर्गम भागातही चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:41 AM2021-01-16T04:41:01+5:302021-01-16T04:41:01+5:30

कोरची : तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. प्रत्येक मतदाराची आरोग्य तपासणी करून मतदाराला प्रवेश दिला ...

Good response even in remote areas of Korchi | कोरचीच्या दुर्गम भागातही चांगला प्रतिसाद

कोरचीच्या दुर्गम भागातही चांगला प्रतिसाद

Next

कोरची : तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. प्रत्येक मतदाराची आरोग्य तपासणी करून मतदाराला प्रवेश दिला जात होता. तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीत सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. थंडीचे दिवस असल्याने सकाळी मतदार केंद्रांवर फारशी गर्दी दिसली नाही, मात्र ११ वाजतानंतर गर्दी वाढत गेली. मतदारांना केंद्रात प्रवेश देण्याआधी त्यांचे तापमान मोजणे, हात सॅनिटाईज करणे आदी बाबी केल्या जात होत्या.

या तालुक्यात एकूण २९ ग्रामपंचायतपैकी १८ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होणार होती. त्यापैकी चार ग्रामपंचायत अविरोध आल्यामुळे १४ ग्रामपंचायतमध्येच निवडणूक झाली. त्यात बोरी, मसेली, बेळगाव, कोहका, नांदळी, नवरगाव, बेतकाठी, अल्लीटोला, बिहिटेकला, कोचीणारा, कोटगुल, नांगपूर,सोनुपूर, मुरकसा या १४ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. यामधील कोटगुल क्षेत्रातील चार मतदान केंद्र नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील असल्याने येथील केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्प कोटगुलला ठेवण्यात आले होते.

तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली आणि मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनसुद्धा केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी यांनी मतदान केंद्रात जाऊन आरोग्य तपासणीची पाहणी केली. दुपारी १.३० वाजेपर्यंत ७५ टक्के मतदान झाले होते.

Web Title: Good response even in remote areas of Korchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.