गडचिराेली : पेट्राेल, डिझेल व गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ हाेत आहे. यासाठी केंद्र शासनाचे धाेरण जबाबदार असल्याचा आराेप करीत दरवाढीविराेधात प्रदेश युवक काॅंग्रेसचे सचिव विश्वजित काेवासे यांच्या नेतृत्वात गडचिराेली शहरात आंदाेलन करण्यात आले. केंद्र सरकार ‘चलाेे जाओ’चा नारा देण्यात आला.
इंदिरा गांधी चाैकात केंद्र शासनाविराेधात घाेषणा दिल्यानंतर गांधी चाैक ते बट्टूवार पेट्राेल पंपापर्यंत दुचाकीला धक्का देत तसेच गॅस सिलिंडर हातात घेऊन माेदी सरकारच्याविराेधात घाेषणाबाजी करण्यात आली. आंदाेलनात युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, विधानसभा युवक काॅंग्रेस अध्यक्ष नीतेश राठाेड, महिला काॅंग्रेस अध्यक्ष भावना वानखेडे, प्रतीक बारसिंगे, बंडू शनिवारे, डाॅ. नीतीन काेडवते, नंदू वाईलकर, दीपक बारसागडे, विवेक धाेंगडे, हार्दीश वैरागडे, जितू मुनघाटे, गाैरव आलाम, याेगेश नैताम, चाेखा भांडेकर, वसंता राऊत, बिट्टू शील, मयूर गावतुरे, अभिजीत धाईत, आरती कंगाले, कांता लाेणारे, आकाश भैसारे, गाैरव येनप्रेडिवार, कल्पना नंदेश्वर, पाैर्णिमा भडके, सुवर्णा उराडे, अहिल्या सहारे, प्रमाेद म्हशाखेत्री, स्वप्निल घाेसे, संजय चन्ने, चाेखा बांबाेळे, गाैरव गावतुरे आदी सहभागी झाले हाेते.