शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

२० रुपयांत मिळवा एकांतवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:05 IST

चामोर्शी मार्गावर गडचिरोली शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर वनविभागाच्या तब्बल १० हेक्टर जागेत चार वर्षापूर्वी विकसित करण्यात आलेले .....

ठळक मुद्देसेमानातील गार्डन झाले प्रेमवीरांचे ठिकाण : शाळेला बुट्टी मारून येतात अल्पवयीन मुले-मुली

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी मार्गावर गडचिरोली शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर वनविभागाच्या तब्बल १० हेक्टर जागेत चार वर्षापूर्वी विकसित करण्यात आलेले सेमाना येथील गार्डन सध्या नवप्रेमींसाठी एकांतवासात घालविण्याचे ठिकाण झाले आहे. २० रुपये प्रतिव्यक्ती एवढ्या तिकीट दरात दिवसभर या गार्डनमध्ये फिरण्याची आणि चक्क छोट्या झोपड्यांमध्ये आडोशाने बसण्याचीही सोय असल्यामुळे प्रेमवीरांसाठी हा मोठा अड्डा झाला आहे.विशेष म्हणजे सज्ञान प्रेमविरांपेक्षा या ठिकाणी येणाºया जोड्यांमध्ये अल्पवयीन अशा शाळकरी मुलांचे प्रमाण जास्त आहे. शाळा- कॉलेजच्या नावाने घरून निघाल्यानंतर थेट या गार्डनमध्ये येणाºया युवक-युवतींच्या जोड्या पाहिल्यानंतर यासाठीच या गार्डनची निर्मिती झाली का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.सेमाना येथे प्राचिन हनुमान मंदिर आहे. इतरही देवतांची मंदिरे या परिसरात आहेत. त्यामुळे अनेक लोक मोठ्या श्रद्धेने येतात. छोटेखानी कार्यक्रमाचीही या ठिकाणी सोय आहे. गडचिरोलीचा नवीन विकसित परिसर असलेल्या चंद्रपूर मार्गावरील कॉम्प्लेक्स परिसरातूनही या ठिकाणी थेट येण्यासाठी डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गडचिरोलीत नोकरीच्या निमित्ताने असणारे राज्य व केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकारी-कर्मचारी वेळ मिळेल तेव्हा या ठिकाणी येतात. विरंगुळा म्हणून बाजुच्या गार्डनमध्ये जातात. पण या ठिकाणी दिसणारे भलतेच चित्र पाहून त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहात नाही.‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत या ठिकाणचे भलतेच चित्र पहायला मिळाले. या ठिकाणी निवांत बसण्यासाठी काही अंतरावर छोट्या-छोट्या झोपड्या बनविल्या आहेत. प्रेमवीर जोडप्यांसाठी एकांतवासाचे हे हक्काचे ठिकाण झाले आहे. झोपडीत बसून गुजगोष्टी करताना कोणाची चाहूल लागली की मुलगी आपला चेहरा झाकून घेते. आपल्या ओळखीचे तर कोणी दिसणार नाही ना, अशी भिती त्यांना असते. पण समोरची व्यक्ती लांब गेली की पुन्हा गुजगोष्टी सुरू होतात. काही जोडपी एकाग्र हंोऊन मोबाईलमध्ये काहीतरी पाहताना दिसतात. कोणाची चाहुल लागताच मोबाईलवरील नजर हटविली जाते. एकूणच सर्वकाही चोरी-चोरी, छुपके-छुपके सुरू असते.या गार्डनचे व्यवस्थापन संयुक्त वनव्यवस्थापन समिती वाकडी यांच्याकडे आहे. गार्डनच्या देखभालीसाठी दररोज ९ रोजंदारी कर्मचारी ठेवलेले आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत गार्डन सुरू राहण्याची वेळ आहे.एकदा प्रतिव्यक्ती २० रुपयांची तिकीट काढून आतमध्ये गेले की गार्डन बंद होईपर्यंतही आतमध्ये राहता येते. दररोज साधारण: २०० लोक या गार्डनला भेट देतात. त्यापैकी अर्ध्याहून अधिक युवक-युवती असतात. पावसाळा संपल्यानंतर ही संख्या आणखी वाढेल. गार्डनमध्ये प्रवेश करताना तोंडावर स्कार्फ बांधून जाऊ नये, गार्डनमध्ये अश्लिल चाळे करू नये अशा सूचना बाहेरच लिहिलेल्या आहेत. पण एकदा आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करता याबद्दल टोकणारे कोणी दिसत नाही.या ठिकाणी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास या गार्डनचा होत असलेला दुरूपयोग थांबविणे शक्य होऊ शकते. पण तसे केल्यास गार्डनचे उत्पन्न कमी होईल म्हणून त्यासाठी वनव्यवस्थापन समिती गांभीर्याने पुढाकार घेताना दिसत नाही. प्रशासनाने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.शाळकरी मुलींसोबत बाहेरची मुलेया ठिकाणी दिसणाºया मुलींपैकी अनेक मुली शाळेच्या पोशाखावरच असतात. यावरून त्या शाळेच्या नावावर घरून निघालेल्या किंवा शाळा-कॉलेजमधून घरी जाण्याच्या नावावर निघून या गार्डनमध्ये आल्याचे स्पष्ट होते. मात्र त्यांच्यासोबत दिसणारी मुले मात्र साध्या पोषाखात दिसत होती. त्यामुळे या शाळकरी मुलींशी बाहेरच्या मुलांनी सूत जुळवून प्रेमचाळे केल्या जात असल्याचे दिसून आले.सहकुटुंब येणे होत आहे कठीणया गार्डनमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरूवातीला कुटुंबियांना बसण्यासाठी चांगले बेंच, मोकळी जागा आहे. बाजुलाच बालकांना खेळण्यासाठी विविध साहित्य आहे. अजून पुढे गेल्यास गुलाबाची छोटेखाणी बाग आणि नंतर मधूनच वाहणारा ओढा व त्यावर छानसा लाकडी पूल आहे. पण तो पूल पार करून पलिकडे गेल्यानंतर दिसणाºया झोपड्या कशासाठी आहेत? असा कुतूहलपूर्ण प्रश्न येथे पहिल्यांदा येणाºयांना पडतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्य तिकडच्या दिशेने पुढे जायला लागताच त्यांची पावलं थबकतात. कारण पुढे फक्त प्रेमवीरांच्या जोड्याच तेवढ्या आडोशा-आडोशाने बसलेल्या दिसतात. बाहेरच बसलेले प्रेमवीरच एवढे बिनधास्त चाळे करतात तर झोपडीतील चित्र काय असेल, असा विचार करून अजून पलिकडे जाण्याऐवजी सहकुटुंब आलेले लोक माघारी फिरतात.झोपड्यांचा आडोसा कशासाठी?या गार्डनच्या विस्तिर्ण परिसरात असलेल्या नाल्यावरील लाकडी पूल ओलांडून पलिकडे गेल्यानंतर साधारणत: ५०-५० फुटांवर अनेक छोट्या झोपड्या बनविल्या आहेत. या झोपड्यांना दारे नसली तरी झोपडीच्या जवळ गेल्याशिवाय आतमधील व्यक्ती काय करत आहेत हे दिसत नाही. दुपारी १२ नंतर त्या सर्व झोपड्या ‘एंगेज’ असतात. एकही झोपडी रिकामी दिसत नाही. झोपडी न मिळालेली जोडी मग आणखी पलिकडे जाऊन दाट झुडूपांचा आडोसा शोधून गुजगोष्टी करत बसतात. काहींना तर आपल्याला कोणी पाहात आहेत याचीही पर्वा नसते. अशी जोडपी दुसºया गावची आहेत हे लक्षात येते.वनविभागाने या गार्डनमध्ये एवढ्या झोपड्या कशासाठी बनविल्या? खास प्रेमीयुगुलांना काही वेळासाठी निवांतपणा, एकांतवास मिळावा यासाठी ही खास सोय केली का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. विशेष म्हणजे या झोपड्यांचा परिसर संपल्यानंतर पुढे आणखी बराच मोठा परिसर आहे. तिकडे दाट झाडे-झुडूपे असल्यामुळे त्या ठिकाणी क्वचितच कोणी जाते. पण प्रेमातूर झालेली काही जोडपी मात्र एकांतवासाच्या शोधात तिकडेही जात असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.पालकवर्गासाठी चिंतेचा विषयआपली मुलं-मुली शाळा-कॉलेजच्या नावावर भलतीकडेच रमत असल्याची कल्पना अनेक पालकांना नाही. योग्य संस्कारांचा अभाव आणि मुलांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे किशोरवयीन मुलीही प्रेमजाळ्यात अडकून मुलांसोबत एकांतवासात येण्यास तयार होत आहेत. मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना पालकांकडून सायकलऐवजी दुचाकी वाहन दिले जाते. वरून मागेल तेवढा पॉकेटमनीही दिला जातो. पण आपली मुले-मुली कुठे जातात, कोणासोबत जातात, दिलेल्या पैशाचे काय करतात याची माहिती पालकवर्ग ठेवत नसल्यामुळे अल्पवयीन मुले-मुली बिघडत आहेत.