शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

​आरमोरी तालुक्यातील घटना : ‎आई-वडील मजुरीला अन् १० वर्षांच्या चिमुरड्याने संपवलं जीवन

By संजय तिपाले | Updated: February 2, 2026 11:31 IST

Gadchiroli News: आरमोरी तालुक्यातील कोजबी गावातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका १० वर्षांच्या निरागस बालकाने मृत्यूला कवटाळल्याने संपूर्ण जिल्हा हळहळत आहे.

 ‎गडचिरोली - आरमोरी तालुक्यातील कोजबी गावातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका १० वर्षांच्या निरागस बालकाने मृत्यूला कवटाळल्याने संपूर्ण जिल्हा हळहळत आहे. संस्कार विनोद कन्नाके असे या  बालकाचे नाव असून, रविवारी सायंकाळी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

‎पोलिसांच्या माहितीनुसार, संस्कारचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरीनिमित्त तेलंगणा राज्यात गेले होते. संस्कार गावातच मोठ्या बहिणीसोबत आजी - आजोबांच्या आश्रयाला राहून जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी तो बाहेरुन घरी परतला. आजी - आजोबा घरीच  होते. मात्र संस्कारच्या मनात नक्की काय सुरू होते, हे कोणालाही उमजले नाही. सायंकाळी ४.३० च्या सुमारास त्याने आजी - आजोबांचे लक्ष नसताना घरातच आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे दृश्य पाहून आजी - आजोबांना धक्का बसला.‎​मनात नक्की होतं तरी काय?‎संस्कारने एवढ्या लहान वयात हे पाऊल का उचलले? शाळेत काही त्रास झाला होता का? आई-वडिलांच्या विरहामुळे तो नैराश्यात होता की गरिबीच्या चटक्याने त्याचे कोवळे मन विदीर्ण झाले होते? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 

‎​पोलिसांकडून तपास सुरू‎घटनेची माहिती मिळताच कोजबीच्या पोलिस पाटील माधुरी सहारे यांनी आरमोरी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे पाठविला. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच अनेक गोष्टींचा उलगडा होईल, असे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy in Armori: 10-Year-Old Ends Life While Parents Worked.

Web Summary : In a heartbreaking incident in Kojbi, a 10-year-old boy died by suicide while his parents were away for work. The boy was living with his grandparents and sister. Police are investigating the cause of this tragic death.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी