लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा (जि. गडचिरोली) : सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका येथील जिल्हा परिषद शाळेत संतापजनक प्रकार समोर आला. या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिलीच्या ६ वर्षीय विद्यार्थ्याला ४ फेब्रुवारी रोजी एका शिक्षकाने बेरीज करता आली नाही म्हणून बेदम मारहाण केली. यात हा बालक गंभीर जखमी झाला आहे.
शिक्षण विभागाचे अधिकारी मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. गटशिक्षणाधिकारी नीलकंठम दोंतुला यांना विचारले असता, अद्याप माझ्यापर्यंत अशी कोणतीही माहिती आली नाही, असे उत्तर त्यांनी दिले. तर, घटनेच्या दिवशी मी शालेय कामानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांसह सिरोंचाला गेलो होतो, असे सांगून मुख्याध्यापक रमेश अग्गुवार यांनी हात झटकले. विद्यार्थ्याने घरी आल्यावर घडला प्रकार सांगितला, तेव्हा पालकांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यानंतर दवाखान्यात जाऊन उपचार घेतले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषद शाळेत सहा वर्षीय बालक नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेरीज करायला सांगितले. मात्र, उत्तर नीट देता आले नाही म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला छडीने पाठीवर बेदम मार दिला. यात विद्यार्थ्याच्या पाठीवर व्रण उमटले.
Web Summary : In Gadchiroli, a teacher severely beat a six-year-old student for failing to solve a math problem correctly. The incident occurred at a Zilla Parishad school, leaving the child injured and sparking outrage. Authorities claim to be unaware, while police allegedly refused to file a complaint.
Web Summary : गढ़चिरौली में, एक शिक्षक ने गणित की समस्या गलत होने पर छह वर्षीय छात्र को बुरी तरह पीटा। घटना जिला परिषद स्कूल में हुई, जिससे बच्चा घायल हो गया और आक्रोश फैल गया। अधिकारियों का दावा है कि उन्हें जानकारी नहीं है, जबकि पुलिस ने कथित तौर पर शिकायत दर्ज करने से इनकार कर दिया।