शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली हादरले ! 'आरडी' एजंटाची निर्घृण हत्या; भरदिवसा घटना घडल्याने खळबळ

By संजय तिपाले | Updated: January 19, 2026 15:32 IST

Gadchiroli : गेल्या २४ तासांपासून बेपत्ता असलेल्या राजेंद्र नामदेवराव तंगडपल्लीवार (४९) या आरडी एजंटाचा सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला.

​लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: गेल्या २४ तासांपासून बेपत्ता असलेल्या राजेंद्र नामदेवराव तंगडपल्लीवार (४९) या आरडी एजंटाचा सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. सिरोंचा रोडवरील नागमाता मंदिराजवळ ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण आलापल्ली परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक राजेंद्र तंगडपल्लीवार हे प्रगती पतसंस्था, आलापल्ली येथे आरडी (आवर्ती ठेव) जमा करण्याचे काम करायचे.  १८ जानेवारी रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास ते पतसंस्थेचे पैसे जमा करण्यासाठी जातो, असे घरी सांगून घराबाहेर पडले. मात्र, दुपारनंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येऊ लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. सर्वत्र शोध घेऊनही पत्ता न लागल्याने सतीश वामनराव कोलपाकवार यांनी अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ मिसिंग नोंदवून शोध सुरू केला होता. मात्र, त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या केल्याचाच संशय व्यक्त केला जात असून उपअधीक्षक अजय कोकाटे, अहेरी ठाण्याचे पो.नि. हर्षल एकरे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. अज्ञात आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.  डोक्यावर गंभीर वार, दुचाकी गायब

​सोमवारी सकाळी ९:१५ वाजताच्या सुमारास नागमाता मंदिराजवळ एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तो मृतदेह राजेंद्र यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोक्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, राजेंद्र यांच्याकडील मोबाईल, जुनी दुचाकी आणि बँकेची पैसे डिपॉझिट करण्याची मशीन घटनास्थळावरून गायब आहे. त्यामुळे हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असावा, असा संशय बळावला आहे. भरदिवसा घटना घडल्याने खळबळ

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळ तातडीने सील केले असून 'फॉरेन्सिक' (न्यायवैद्यक) टीमला पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून काही पुरावे हाती लागतात का, यादृष्टीने तपास सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli Shaken: RD Agent Brutally Murdered in Broad Daylight

Web Summary : RD agent Rajendra Tangadapalliwar was found murdered near Nagmata Temple, Gadchiroli. He was missing for 24 hours. Police suspect robbery as his motorcycle and deposit machine are missing. Investigation underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली