लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी शेतकरी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा व समर्थन म्हणून गडचिरोली येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव भवनात धरणे आंदोलन केले.शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, ६० वर्षावरील शेतकºयांना दरमहा पाच हजार रूपये पेंशन देण्यात यावी, शेतमालाला हमीभाव उत्पादन खर्चाच्या आधारित दीडपट हमीभाव देण्यात यावा, तसेच सशक्त जनलोकपाल विधेयक व राज्यात लोकायुक्ताची नेमणूक करून अंमबलजावणी करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे अध्यक्ष डॉ.शिवनाथ कुंभारे, अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे, गुरूदेव सेवा मंडळाचे ग्रामसेवाधिकारी सुखदेवे वेठे, सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा.देवानंद कामडी, जनहितवादी युवा समितीचे सुरेश बारसागडे, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे निमंत्रक विजय खरवडे, पांडुरंग गोटेकर, विवेक मून, राम भुसारी, मुरारी दहिकर, जनार्धन पाटील, नानाजी वाढई, प्रा.निलिमा सिंह, शेतकरी संघटनेचे राजू जक्कनवार, नीलकंठ संदोकार, वाकडीचे सरपंच चरणदास बोरकुटे, गुरूदेव सेवा मंडळाचे सचिव पंडित पुडके, रमेश बांगरे आदी सहभागी झाले होते.
गडचिरोलीत धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 01:17 IST
ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी शेतकरी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा व समर्थन म्हणून गडचिरोली येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव भवनात धरणे आंदोलन केले.
गडचिरोलीत धरणे आंदोलन
ठळक मुद्देअण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ आंदोलन : शेतकरी व सर्वसामान्यांच्या मागण्या