शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

गडचिरोलीत चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:38 IST

गडचिरोली व देसाईगंज तालुक्यात पोलिसांनी अवैधपणे दारू वाहतूक करणाऱ्यावर केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा पकडला. दोन्ही वाहने जप्त करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देदोन वाहनेही जप्तगडचिरोली ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली व देसाईगंज तालुक्यात पोलिसांनी अवैधपणे दारू वाहतूक करणाऱ्यावर केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा पकडला. दोन्ही वाहने जप्त करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.शुक्रवारच्या रात्री पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात गडचिरोली ठाण्याचे निरीक्षक संजय सांगळे व एसडीपीओ कार्यालयातील पोलीस हवालदार राजेंद्र तितीरमारे, विजय राऊत, नापोशि दीपक डोंगरे, हवालदार नरूले, राऊत यांनी आरमोरी मार्गावरील खरपुंडीजवळ सापळा रचला. त्यात टाटा इंडिगो कार (एमएच ३१, सीएन ६३७८) हे वाहन संशयास्पदरित्या आढळल्यानंतर सिनेस्टाईल पाठलाग करून त्या वाहनाची तपासणी केली. त्यात इम्पेरियल ब्लू या कंपनीच्या १२ पेट्या (प्रतिपेटी १८० मिलीच्या ४८ निप) व्हिस्की आढळली. त्या ५७६ सीलबंद निपचा गडचिरोलीतील विक्री किमतीनुसार (३०० रुपये प्रति निप) १ लाख ७२ हजार रुपये किमतीची दारू अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचे आढळले. याप्रकरणी आरोपी अरुण केशव अष्टणकर रा.खरबी, पो.हुडकेश्वर ता.गडचिरोली याच्याविरूद्ध कलम ६५ (ई), ९८ (क) मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.दुसºया कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे केलेल्या कारवाईत देसाईगंज ते अर्जुनी मार्गावर सापळा रचून बेकायदेशिरपणे दारू वाहतूक करणाºया मारूती स्विफ्ट (एमएच ३१, सीएन ४८२०) या वाहनाला थांबविले. यावेळी चालकाच्या बाजुला बसून असलेला इसम सुरज पत्रे रा.गांधी वार्ड, देसाईगंज हा पळून जाण्यात यशस्वी झाला. वाहनचालक दिलीप आशन्ना कुचलकार रा.आंबेडकर वार्ड, देसाईगंज याला ताब्यात घेऊन वाहनातील दारूसाठा जप्त केला. त्यात देशी दारू सुप्रिम नंबर १ या कंपनीच्या ९० मिलीच्या २८०० सीलबंद निप, १८० मिलीच्या १९२ निप, रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या ४०० निप, इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १११ निप असा अडीच लाखांचा दारूसाठा तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली. ही कार देसाईगंज येथील दारू पुरवठादार गुरूबचसिंग मक्कड याच्या मालकीची आहे. या तिघांवरही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आली.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निपीक्षक प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊराव बोरकर, नरेश सहारे, दुधराम चवारे, चंदू मोहुर्ले, प्रशांत पातकमवार यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा