शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेली पाेलीस दादालाेरा खिडकीला 2021 सालचा 'फिक्की'चा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 23:52 IST

दिल्ली येथे सन्मानित, साामाजिक उपक्रमांची दखल

गडचिराेली: भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघच्या वतीने देण्यात येणारा ‘फिक्की स्मार्ट पोलिसींग पुरस्कार २०२१’ हा पुरस्कार गडचिरोली दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीला मिळाला आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यावतीने सहायक पाेलीस निरिक्षक महादेव शेलार यांनी हा पुरस्कार २ सप्टेंबर राेजी दिल्ली येथे आयाेजीत कार्यक्रमात स्विकारला.पुरस्कार वितरण साेहळ्याला माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई आणि युपीचे माजी डीजीपी प्रकाश सिंग यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कम्युनिटी पाेलिसिंग या श्रेणीतून गडचिरोली पोलीस दलाला पुरस्कार मिळाला.

गरीब नागरिकांसाठी शासनामार्फत विविध याेजना राबविल्या जातात. गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ९९ टक्के जनता या याेजनांसाठी पात्र ठरते. मात्र अनेकांकडे दाखले राहत नाही. किंवा तालुकास्थळी जाऊन याेजनेसाठी अर्ज करणे शक्य हाेत नाही. अशा परिस्थिती गडचिराेली पाेलीस दलाने जिल्हा पाेलीस अधिक्षक अंकित गाेयल यांच्या संकल्पनेतून ‘पाेलीस दादालाेरा खिडकी’(पाेलीस दादाची खिडकी) हा उपक्रम राबविला. उघड्या खिडकीप्रमाणे पाेलीस मदतीसाठी कधीही तयार तयार राहतील या अर्थाने खिडकी हे नाव याेजनेला देण्यात आले. या याेजनेच्या माध्यमातून जिल्हाभरातील पाेलीस स्टेशनमध्ये विविध मेळावे घेऊन दुर्गम भागातील नागरिकांना याेजनांची माहिती देण्यात आली. याेजनेसाठी दाखले काढून देण्यात आले. तसेच याेजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले. नागरिकांचे संरक्षण करण्याबराेबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही गडचिराेली पाेलिसांनी प्रयत्न केले. गडचिराेली पाेलीस दलाच्या या कार्याची दखल घेऊन फिक्कीने पुरस्कार दिला. जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी या पुरस्काराचे श्रेय सर्व पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे.

२ लाख १४ हजार ५३८ नागरिकांना लाभ

जिल्ह्यातील ५३ पाेलीस स्टेशन, उपपाेलीस स्टेशन व पाेलीस मदत केंद्रात 'पोलीस दादालोरा खिडकी' सुरू केल्या आहेत. या याेजनेच्या माध्यमातून २ लाख १४ हजार ५३८ नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळाला आहे. त्यात ९ हजार २६ जणांना जात प्रमाणपत्र, १ लाख २० हजार ७०५ नागरिकांना विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून दिले. ५५ हजार ३२० नागरिकांना विविध याेजनांचा लाभ, ५ हजार ६४१ जणांना व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार आदी लाभ मिळवून दिले आहेत.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस