शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

'मोस्ट वाँटेड' नक्षलवादी नेता सुदर्शनचा हदयविकाराने मृत्यू

By संजय तिपाले | Updated: June 5, 2023 12:04 IST

पत्रकाद्वारे माओवाद्यांची माहिती: शासनाने जाहीर केले होते ८० लाखांचे बक्षीस

गडचिरोली : तब्बल पाच दशके नक्षलवादी चळवळीत सक्रिय राहून एकदाही पोलिसांच्या हाती न लागलेला व शासनाने ८० लाख रुपयांचे बक्षीस ठेवलेला मोस्ट वाँटेड नक्षली नेता सुदर्शन कटकम (६९) याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. माओवाद्यांनीच पत्रक काढून ही माहिती दिली. 

सुदर्शन कटकम नक्षली चळवळीत कॉम्रेड आनंद म्हणून ओळखला जात असे. मूळचा बेल्लमपल्ली जि. आदिलाबाद, आंध्रप्रदेश येथील सुदर्शन १९७४ मध्ये खाणकाम पदविकेच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतानाच नक्षली चळवळीकडे ओढला गेला. १९७८ मध्ये लक्सेट्टीपेटा-जन्नारम इलाकामध्ये पक्ष समन्वय म्हणून तो नक्षलवादी चळवळीत सक्रिय झाला. १९८० मध्ये आदिलाबाद जिल्हा समिती सचिव म्हणून काम करत त्याने १९८५ मध्ये दंडकारण्यात प्रेवश केला. त्याच्याकडे गडचिरोलीतील सिरोंचा पथकाचे नेतृत्व सोपवण्यात आले.

दंडकारण्यात पाठविलेल्या सात पथकापैकी ते एक होते. पुढे याचा विस्तार छातीसागडमधील बस्तरपर्यंत झाला. त्याने आदिलाबाद,गडचिरोली,बस्तर ते पूर्व गोदावरीपर्यंत विस्तारित ‘रिट्रीट झोन’ तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तो सीपीआय-एमएल पीपल्स वॉरच्या ‘वन संपर्क समिती’ सदस्य होता. १९९५ मध्ये त्याची नव्याने स्थापन झालेल्या ‘उत्तर तेलंगणा स्पेशल झोनल कमिटी’च्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनतर ‘ऑल इंडिया स्पेशल कॉन्फरन्स’मध्ये केंद्रीय समितीवर निवड, तसेच २००१ आणि २००७ त्यांची केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्युरो सदस्य म्हणून निवड झाली. 

पोलिसांसोबत झालेल्या अनेक चकमकीत तो बचावला होता. नक्षल चळवळीचा विस्तार  करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. मागील काही वर्षांपासून त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब सारख्या आजारांनी ग्रासले होते. अखेर ३१ मे रोजी त्याचा छत्तीसगडच्या जंगलात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. माओवादी संघटनेचे केंद्रीय समिती प्रवक्ता अभय याने पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

भूमिगत राहून आखल्या व्यूहरचना

नक्षली चळवळीच्या कठीण प्रसंगात सुदर्शन कटकमने विविध व्यूहरचना आखत पोलिसांना आव्हान दिले. २००१ ते २०१७ पर्यंत रिजनल ब्युरो (सीआरबी) सचिवपदाच्या जबादारी त्याने सांभाळली, २०१७ नंतर तो स्वेच्छेने यातून मुक्त झाला. पुढे पोलिस ब्युरो सदस्य म्हणून तो नक्षली चळवळीसाठी काम करत होता. केंद्रीय कमिटी मीडिया प्रवक्ता म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधण्याची पद्धत सुद्धा त्यानेच सुरू केली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली