शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी

By संजय तिपाले | Updated: July 26, 2023 12:05 IST

गडचिरोलीचा विकास झाला, त्यामुळे अतिरिक्त ३० टक्के निधी दिल्याने शासनाचे नुकसान होत असल्याचा आश्चर्यकारक दावाही त्यांनी केला आहे.

संजय तिपाले

गडचिरोली: आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एकीकडे आमदारांमध्ये जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी चढाओढ लागते, परंतु येथील भाजपचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी अतिदुर्गम, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोलीला मिळणारा 'सीएसआर'चा ३० टक्के निधी बंद करावा, अशी अजब मागणी केली आहे.

गडचिरोलीचा विकास झाला, त्यामुळे अतिरिक्त ३० टक्के निधी दिल्याने शासनाचे नुकसान होत असल्याचा आश्चर्यकारक दावाही त्यांनी केला आहे. आमदार होळी हे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडून आलेले आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे. गेल्या आठवड्यात ओबीसींवर अन्याय होत असल्याने तलाठी भरतीला स्थगिती द्यावी, अशी मागणी आमदार होळी यांनी केली होती. त्यावर एका आदिवासी तरुणाने त्यांना फोनवरुन विचारणा केली असता 'तुझ्या एका मताने निवडून येतो का?', अशा शब्दांत प्रत्युत्तर दिल्याची आमदार होळी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.आता सीएसआरच्या निधीमुळे शासनाने नुकसान होत आहे, हा निधी बंद करा, असे अजब तर्क मांडल्याने ते चर्चेत आले आहेत. २४ जुलै रोजी विधिमंडळात त्यांनी आदिवासी जिल्हा म्हणून दहा टक्के व अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त  जिल्हा म्हणून २० टक्के असा एकूण ३० टक्के अतिरिक्त निधी दिला जातो, परंतु गडचिरोलीचा विकास झाला असून आता निधीची  आवश्यकता नाही, अशा प्रकारची मागणी केल्याची चित्रफित सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून सर्वस्तरातून आमदार होळींवर टीका होत आहे. दरम्यान, यासंदर्भात आमदार होळी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांची बाजू मांडली. 

मागील ९ वर्षांत जिल्ह्याला कधी नव्हे एवढा निधी आणला. रस्ते, आरोग्य, शिक्षण यावरी मोठ्या प्रमाणात कामे केली. मात्र, सीएसआरचा निधी आहे म्हणून कमी दराने कंत्राट घेऊन कंत्राटदार थातूरमातूर कामे करत असतील, शासनाच्या अतिरिक्त निधीचा चुराडा होत असेल याबद्दल बोलले पाहिजे. त्यामुळे ही मागणी केली. विकासासाठी आम्ही सक्षम आहोत, त्यात कुठेही कमी पडणार नाहीत.- डॉ.देवराव होळी, आमदार गडचिरोली

काय असतो सीएसआर फंड?कॉर्पोरेट कंपन्यांकडून सामाजिक दायित्व (सीएसआर) म्हणून एकूण नफ्याच्या २ ते ५ टक्क्यांपर्यंत रक्कम दिली जाते. या रक्कमेचा वापर सामाजिक उत्थानासाठी तसेच गरजू भागात शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा अशा कामांसाठी केला जातो.  

गडचिरोलीचा विकास रोखण्याचे षडयंत्र

२००९ मध्ये दिवंगत नेते आर.आर.पाटील यांनी गडचिरोलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सीएसआर निधीसाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर जिल्ह्यात अनेक कामे झाली. आता कुठे जिल्हा विकासाकडे आगेकूच करत आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या आमदारांनी विकास निधी बंद करण्याची मागणी करुन आदिवासी बांधवांच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केला. जिल्ह्याचा विकास झाला असा दावा आमदार देवराव होळी यांनी कशाच्या आधारे केला हे त्यांनाच माहीत. मात्र, यातून गडचिरोलीचा विकास रोखण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याचे दिसत आहे. विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याऐवजी निधी नको म्हणणाऱ्या आमदारांना आता जनताच जागा दाखवून देईल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीBJPभाजपाMLAआमदारvidhan sabhaविधानसभा