शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

गत वर्षभरात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात १९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:59 AM

गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना २०१७ या संपलेल्या वर्षात चांगलेच यश प्राप्त झाले. वर्षभरात १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले.

ठळक मुद्दे२२ जणांचे आत्मसमर्पण६७ समर्थकांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना २०१७ या संपलेल्या वर्षात चांगलेच यश प्राप्त झाले. वर्षभरात १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर ६७ नक्षलवादी व नक्षल समर्थकांना अटक करण्यात यश मिळाले. तसेच २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.सुरुवातीला राज्याच्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि नांदेड या सहा जिल्ह्यात कार्यरत असलेला नक्षलवाद हा आता केवळ गडचिरोली जिल्हा तसेच गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यापुरताच मर्यादित राहिला आहे. नक्षलग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां लोककल्याणकारी व विकासाच्या विविध योजनांमुळे तसेच पोलिसांचा दुर्गम भागातील ग्रामस्थांशी वाढलेला जनसंपर्क व संवादामुळे शासनाच्या विकासाला जनतेचा पाठींबा मिळू लागला आहे. पोलिसांच्या यशस्वी विशेष रणनितीमुळे २०१७ या वर्षात नक्षली चळवळीला मोठ्या प्रमाणात हादरा बसून नक्षल चळवळीची मोठी हानी झाली आहे. नक्षल्यांबरोबरीच्या लढाईत पोलिसांनी उत्तम कामगिरी राहिली.२०१७ या वर्षात एकूण १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. यामध्ये मात्र ३ पोलिस शहीद झाले. पोलिसांनी ६७ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यातही यश मिळविले असून २२ नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारला.त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला. १८१ गावांनी गावबंदी ठराव करून नक्षल्यांना गावाबाहेरच रोखल्यामुळे नक्षल्यांचा जनाधार ओसरला. या वर्षात मोठ्या प्रमाणावर नक्षली मारले गेल्यामुळे नक्षल्यांचे संख्याबळही कमी झाले आहे. एकीकडे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन अनेक नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करीत असल्यामुळे नक्षल्यांना त्यांचे उर्वरीत संख्याबळही टिकवून ठेवणे कठीण झाले आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील स्थानिक जनतेने नक्षल्यांना गावबंदी करून शासनाच्या विकासाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे नक्षल भरतीसाठी तरूण मिळत नसल्याने नक्षल्यांची चळवळ कमकुवत झाली आहे. पोलिसांच्या यशस्वी रणनितीमुळेच नक्षल्यांचा मुख्य गड असलेल्या अबुझमाड जंगलातील शिबीर उध्वस्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये स्थानिक गावकºयांनी नक्षली बॅनर, नक्षल नेत्यांचे पुतळे जाळल्याने, तसेच नक्षल स्मारक तोडल्यामुळे उरलेला जनाधारही नक्षल्यांचा कमी झालेला आहे. असल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे.

पोलिसांनी नक्षलग्रस्त व दुर्गम भागात जनसंपर्क वाढवून स्थानिक जनतेचा विश्वास संपादन केला. तसेच ग्रामभेट, जनजागरण मेळावे आदी उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांशी समन्वय ठेवून नागरीकांच्या समस्या पोलिसांकडून नियमित सोडविल्या जात असल्यामुळे जनतेचा शासनावर विश्वास वाढला आहे. नक्षली केवळ दिशाभूल करीत असल्याची जाणीव नक्षलग्रस्त भागातील नागरीकांना झाली असल्यामुळे त्यांनी शासनाच्या विकासाला होकार व नक्षल्यांना नकार दिला आहे.-शरद शेलार, पोलिस महानिरीक्षक तथा नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख

टॅग्स :naxaliteनक्षलवादी