शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी मतदार संघांना आजपर्यंत लाभलेले आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:02 IST

Gadchiroli Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : जिल्ह्यातील तिनही मतदार संघांना लाभलेले शिलेदार

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोलीअहेरी या तीनही मतदार संघातील मतदारांनी आलटून-पालटून विजयाची माळ वेगवेगळ्या उमेदवारांच्या गळ्यात घातली. 

सन १९६२ ते २०२४ या कालावधीतील तीनही मतदार संघाचा आजपर्यंतचा आढावा बघितल्यास येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना आदी पक्षांच्या उमेदवारांना विधानसभेत पोहोचण्याची संधी मिळाली. याशिवाय नाविस, गोंगपा या लहान पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनीही विधानसभेचे प्रतिनिधीत्त्व केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे. या तीनही मतदार संघात आजपर्यंत महिलांना आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करता आले नाही. सन २०१४ व २०१९ तसेच आता २०२४ मध्ये जिल्ह्यातील मतदारांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या झोळीत भरभरून मतदान केल्याचे दिसून येते. या तीन पक्षाच्या उमेदवारांना आमदार होता आले. 

सन २००९ च्या निवडणुकीत जिल्ह्यात गडचिरोली व आरमोरी या मतदार संघात काँग्रेसने विजय मिळविला. तर अहेरीमध्ये अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर राजकारणाचे जिल्ह्यातही संदर्भ बदलले. विशेष म्हणजे, गडचिरोली व आरमोरी मतदार संघात आजवर अनेक महिला उमेदवारी घेत रिंगणात उतरल्या होत्या. मात्र एकाही महिला उमेदवाराला विजय मिळविता आला नाही.

अहेरी विधानसभा मतदार संघ १९६२-२०२४१९६२ - राजे विश्वेश्वरराव आत्राम (अपक्ष) १९६७ - जे. वाय. साखरे (अपक्ष) १९७२ - मुकूंदराव अलोने (काँग्रेस) १९७७ - भगवानशहा मेश्राम (अपक्ष)१९८० - पेंटारामा तलांडी (बिनविरोध, काँग्रेस)१९८५ - सत्यवानराव आत्राम (नाविस)१९९० - धर्मरावबाबा आत्राम (काँग्रेस)१९९५ - सत्यवानराव आत्राम (नाविस) १९९९ - धर्मरावबाबा आत्राम (गोंगपा) २००४ - धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)२००९ - दीपक आत्राम (अपक्ष) २०१४- अम्ब्रीशराव आत्राम (भाजप) २०१९ - धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)२०२४ - धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)

आरमोरी विधानसभा मतदार संघ १९६२-२०२४१९६२ जगन्नाथ पा. म्हशाखेत्री (भाराकाँ)१९६७ - डी.व्ही. नारनवरे (भाराकाँ)१९७२ - बाबुराव मडावी (भाराकाँ) १९७७ - दिनाजी नारनवरे (अपक्ष) १९८० - बाबुराव मडावी (भाराकाँ) १९८५ - सुखदेवबाबू उईके (भाराकाँ) १९९० - हरीराम वरखडे (शिवसेना) १९९५ - डॉ. रामकृष्ण मडावी (शिवसेना) १९९९ - डॉ. रामकृष्ण मडावी (शिवसेना) २००४ - आनंदराव गेडाम (काँग्रेस) २००९ - आनंदराव गेडाम (काँग्रेस) २०१४ - कृष्णा गजबे (भाजप) २०१९ - कृष्णा गजबे (भाजप) २०२४ - रामदास मसराम (काँग्रेस)

गडचिरोली विधानसभा मतदार संघ १९६२-२०२४१९६२ - फतेलालशाह सयाम (अपक्ष) १९६७ आर. डी. आत्राम (अपक्ष) १९७२ - विश्वेश्वराव आत्राम (अपक्ष) १९७७ देवाजी मडावी (काँग्रेस आय) १९८० मारोतराव कोवासे (काँग्रेस) १९८५ - हिरामण वरखडे (जनता पार्टी) १९९० - मारोतराव कोवासे (काँग्रेस)१९९५ - मारोतराव कोवासे (काँग्रेस) १९९९ - अशोक नेते (भाजप) २००४ - अशोक नेते (भाजप) २००९ - डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस) २०१४ - डॉ. देवराव होळी (भाजप) २०१९ - डॉ. देवराव होळी (भाजप) २०२४ - डॉ. मिलिंद नरोटे (भाजप)

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Gadchiroliगडचिरोलीarmori-acअरमोरीaheri-acअहेरीgadchiroli-acगडचिरोलीMLAआमदार