शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंगणात झाेपलेल्या व्यक्तीला पेट्रोल टाकून पेटविले, नक्षलग्रस्त छल्लेवाडातील थरार, मृत्यूशी झुंज सुरू

By संजय तिपाले | Updated: June 2, 2024 14:53 IST

Gadchiroli News: घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त छल्लेवाडा या येथे उघडकीस आली.

- संजय तिपाले  गडचिरोली - घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त छल्लेवाडा या येथे उघडकीस आली. चरणदास गजानन चांदेकर (४८) असे  जखमीचे नाव असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरु आहेत. या क्रूर हल्ल्यामागील नेमके कारण अस्पष्ट आहे.

चरणदास चांदेकर हे उकाड्यामुळे अंगणात खाटेवर झोपले होते. मध्यरात्री अज्ञात आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले व काडीपेटीने आग लावली. यानंतर तो पळून गेला. इकडे आगीच्या ज्वालांमध्ये चरणदास यांचे शरीर भाजले गेले. 

त्यांनी आरडाओरड केल्यावर कुटुंबातील इतर सदस्यांनी आग विझवली. परंतु तोपर्यंत आगीमुळे चरणदास यांना गंभीर इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे.   त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे. याप्रकरणी रेपनपल्ली  ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संशयितांकडे चौकशी सुरुचरणदास यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांकडे पोलिसांनी तपास सुुर केला आहे. मात्र, चरणदास यांचा गावात कोणाशी वाद नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला नेमका कोणी केला याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. तपास सुरु असल्याचे रेपनपल्ली पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली