धानोरा विलगीकरण कक्षातील नागरिकांचा गावात मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:51+5:30

धानोरा तालुक्यातील दोन नागरिक ३ जुलै रोजी केरळ राज्यातून परत आले. त्यांना धानोरा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ११ जुलै रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोघेही जण दारू पिऊन धानोरा येथे बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी त्यांना विचारणा केली असता, आपण क्वारंटाईन सेंटरमधील असल्याचे सांगितले.

Free movement of citizens of Dhanora Separation Cell in the village | धानोरा विलगीकरण कक्षातील नागरिकांचा गावात मुक्तसंचार

धानोरा विलगीकरण कक्षातील नागरिकांचा गावात मुक्तसंचार

Next
ठळक मुद्देकोरोनाचा धोका : गावकऱ्यांनी दोघांना पकडून नेले सेंटरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले दोन नागरिक ११ जुलैच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास दारू पिऊन धानोरा येथे मुक्त संचार करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यामुळे कोरोनाचा संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धानोरा तालुक्यातील दोन नागरिक ३ जुलै रोजी केरळ राज्यातून परत आले. त्यांना धानोरा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ११ जुलै रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोघेही जण दारू पिऊन धानोरा येथे बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी त्यांना विचारणा केली असता, आपण क्वारंटाईन सेंटरमधील असल्याचे सांगितले. नागरिकांनी त्यांना पकडून क्वारंटाईन सेंटरमध्ये नेले. वसतिगृहाच्या दरवाजाच्यावर दोन शिक्षक कार्यरत होते. त्यांना सदर नागरिक कसे काय, बाहेर गेले, असे विचारले असता, मागील बाजूने दोघेजण बाहेर गेल्याने आम्हाला दिसले नाही, अशी माहिती संबंधित शिक्षकांनी दिली.
याबाबत धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर व पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी भेट देऊन चौकशी केली असता, ३८ नागरिक क्वारंटाईन असल्याचे दिसून आले. जे दोघेजण धानोरा येथे दारू पिऊन फिरले त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र अजुनपर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त झाले नाही. जर या दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यास नवीन संकट निर्माण होणार आहे. ते कोणाकडे दारू पिण्यासाठी गेले, त्यांना पकडून नेणारे नागरिक या सर्वांची तपासणी करावी लागेल.
विलगीकरण कक्षातील नागरिक बाहेर जात असल्याने येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Free movement of citizens of Dhanora Separation Cell in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.