शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

ठिकठिकाणचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:17 IST

वनसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात यावर्षी वणवे पेटण्याच्या सर्वाधिक म्हणजे ३०० घटना घडल्या आहेत. त्या आगींवर नियंत्रण मिळवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या जंगलात तर वनकर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी पोहोचणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देयावर्षी ३०० घटना : वणव्यांचे नियंत्रण अवाक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात यावर्षी वणवे पेटण्याच्या सर्वाधिक म्हणजे ३०० घटना घडल्या आहेत. त्या आगींवर नियंत्रण मिळवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या जंगलात तर वनकर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी पोहोचणेही कठीण झाले आहे. मोहफूल आणि तेंदूपत्त्याच्या हंगामासाठी लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे वनसंपदेला हाणी पोहोचण्यासोबतच सरपटणारे प्राणी आणि वन्यजीवांना प्राणास मुकावे लागत आहे.जिल्ह्याच्या भौगोलिक प्रदेशापैक ७६ टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. दरवर्षी मार्च महिन्यानंतर जंगलात वणवे लागायचे. परंतु यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच मोहफूल हंगामाला सुरूवात झाली. मोहफूल गोळा करणारे नागरिक झाडाखालील जागा स्वच्छ करून पालापाचोळा जमा करून जाळत आहेत. मोहाची झाडे भरपूर प्रमाणात असलेल्या भागात आगीचे प्रमाण जास्त दिसत आहे. तसेच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्यांकडूनही फुटवे तोडून लगतचे जंगल साफ करण्यासाठी तो त्या भागाला आगी लावल्या जातात. ही आग पसरत जाऊन शेकडो हेक्टर जंगलाला कवेत घेते.वनविभागाने यावर्षी १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान गावोगावी जनजागृती करून आगी न लावण्याचे आवाहन करण्यात आले. पण त्याचा फारसा फरक पडला नाही. आगींचे प्रमाण पाहता उपाययोजनांसाठी निधीची गरज असून जिल्हा आपत्ती निवारणाच्या निधीतून यासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वनरक्षकांकडे फायर ब्लोअर देण्यात आले आहेत.- तर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईयावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात वणने का लागत आहेत याचे कारण शोधण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाºयांनी दिले आहेत. त्यासाठी फायर आॅडिट केले जाणार आहे. वणव्याबाबत सॅटेलाईट संदेश मिळाल्यानंतर तातडीने वणवा विझविण्याकडे, आगी लावणाºयांवर कारवाई करण्याकडे संबंधित क्षेत्रातील वनअधिकारी-कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यााचा प्रस्ताव जाणार आहे.

टॅग्स :fireआगforestजंगल