शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‎समोर वनविभागाचे 'बचाव' धडे, ‎मागे बिबट्याने केला तरुणावर हल्ला !

By संजय तिपाले | Updated: February 25, 2026 15:21 IST

Gadchiroli : एकीकडे वनविभाग बिबट्यापासून बचावाचे धडे देण्यासाठी गावात जनजागृतीपर चित्रफीत दाखवत असतानाच, दुसरीकडे त्याच घराच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर झडप घातल्याची थरारक घटना

गडचिरोली : एकीकडे वनविभागबिबट्यापासून बचावाचे धडे देण्यासाठी गावात जनजागृतीपर चित्रफीत दाखवत असतानाच, दुसरीकडे त्याच घराच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर झडप घातल्याची थरारक घटना धमदीटोला (ता. कुरखेडा) येथे २४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घडली. या हल्ल्यात सदानंद धरमदास उईके (३२) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.​‎धमदीटोला परिसरात मागील आठवडाभरापासून  एका नरभक्षक  बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावकऱ्यांमधील भीती दूर करण्यासाठी  रात्री वनविभागाचे पथक गावात चित्रफीत दाखवत होते. 'बिबट्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा' याचे मार्गदर्शन सुरू असतानाच, सदानंद उईके हा तरुण लघुशंकेसाठी घराच्या मागील बाजूस गेला. तिथेच दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट सदानंदच्या अंगावर झडप घेतली. त्याने आरडाओरड केली. त्यानंतर आवाज ऐकताच चित्रफीत पाहणारे नागरिक आणि वनकर्मचारी धावत सुटले. लोकांचा गराडा पाहताच बिबट्याने तिथून धूम ठोकली, ज्यामुळे सदानंदचा जीव थोडक्यात वाचला. त्याला तातडीने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.‎​पाच दिवसात तिसऱ्यांदा हल्ला 

‎​या बिबट्याने परिसरात दहशत निर्माण केली आहे. यापूर्वी मका पिकात लपलेल्या बिबट्याला हाकलून लावताना दोन तरुण जखमी झाले होते. तसेच, सदानंद उईके आणि अन्य एका शेतकऱ्याच्या वासरालाही बिबट्याने फस्त केले आहे. रक्ताची चटक लागलेला हा बिबट्या आता थेट वस्तीत शिरत असल्याने गावकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे.‎​नेत्यांची धाव, वनविभागाला धारेवर धरले

आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयात काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी पं.स. सभापती गिरीधर तितराम आणि माजी पं.स. सदस्य धरमदास उईके यांनी जखमीची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड यांच्याशी संपर्क साधून संताप व्यक्त केला. ​नरभक्षक बिबट्याला तातडीने पिंजऱ्यात जेरबंद करा, ​जखमींना आणि पशुपालक शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या, ​या अशी मागणी करण्यात आली.‎​दहशतीचे सावट!

‎रात्री आणि पहाटे घराबाहेर पडणे आता मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. वनविभागाची गस्त सुरू असली तरी बिबट्या वारंवार गावात शिरत असल्याने वनविभाग फक्त चित्रफिती दाखवणार की बिबट्याला जेरबंद करणार? असा संतप्त सवाल धमदीटोलावासीय विचारत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli: Leopard attacks youth during forest dept's awareness program.

Web Summary : A leopard attacked a youth in Dhamditola, Gadchiroli, even as the forest department conducted an awareness program on leopard safety. The victim is seriously injured. This is the third attack in five days, sparking outrage among villagers.
टॅग्स :Leopard Attackबिबट्याचा हल्लाleopardबिबट्याGadchiroliगडचिरोलीforestजंगलforest departmentवनविभाग